Homeक्राईमवाघोलीत एमडी ड्रग्जचा मोठा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

वाघोलीत एमडी ड्रग्जचा मोठा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वाघोली पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि.०५/०४/२०२६ रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे सुचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथक अधिकारी असे गुन्हे प्रतिबंध, अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करित असताना आशियाना लॉज जवळ, सातव वस्ती रोड, मोकळया जागेत, वाघोली पुणे येथे आलो असता पोलीस अंमलदार प्रदिप मोटे, विशाल गायकवाड यांना संशयित इसम कारसह दिसल्याने त्यांना हटकले असता तो घाईगडबडीत जावू लागल्याने त्याचेवर अधिक संशय आल्याने त्यास ताब्यात घेवून नाव पत्ता विचारला असता त्याचे नाव १) योगेश सुभाष कणगरे वय ३८ वर्षे, रा. रूमनं. ३, शिवकृपा बिल्डींग, लेननंबर ३, साई नगर, लोहगाव, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याची अंगझडीती मध्ये १,०८,०००/- रु.कि.चा मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर वजन ५ ग्रॅम ४ मिलीग्रॅम, ३,००,०००/- रू किं.ची चारचाकीगाडी असा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करून त्यानुसार गु.र.नं २२१/२०२६, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २१(ब) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. १) योगेश सुभाष कणगरे यास अटक केली असून तपास दरम्यान त्याने मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर हि त्याचा मित्र सोनू सिंह यांचेकडून घेतलेचे सांगितले आहे. त्यावेळी सोनू सिंह ऊर्फ मनुवेंद्र ऊर्फ सोनू शंकर सिंह वय ४२ वर्षे, रा. फ्लॅट नं.१, सर्वेनंबर ३४/१,विदयानगर,गुड विल रेसिडेन्सी, लेननंबर १३, टिंगरेनगर, पुणे याचा शोध घेवून त्यास अटक केली असून त्याचे अंगझडती मध्ये १,७४,०००/- रू किंचे मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर वजन ८ ग्रॅम ७ मिलीग्रॅम, ५०,०००/- रू. किंचे होंडा कंपीनीची अॅक्टीव्हा दुचाकी, १०,००० /- रू किंचे एक ओप्पो कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त केला आहे. तपास दरम्यान त्याचे घर व कारझडती केली असता त्याचे राहते घराचे पार्किंग मधील त्याची वापरती कारमध्ये ४,६४,००० /- रू किं.चे मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर वजन २३ ग्रॅम २ मिलीग्रॅम, २०,००,०००/- रु किं ची अॅडी कंपनीची कार असा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त केला आहे. ३७ ग्रॅम ३ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर, एक मोबाईल, दोन कार असा एकुण ३१,०६,०००/- रुपये किं चा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल हे करित आहेत.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा.पोलीस उप आयुक्त परीमंडळ ७, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग पुणे शहर श्री. नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली श्री.नंदकुमार गायकवाड पोलीस स्टेशन,पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती पल्लवी मेहेर वाघोली पोलीस स्टेशन, सहा.पोलीस निरीक्षक, विनायक अहिरे, तपास पथक अधिकारी पोउपनि / मनोज बागल, पोलीस उपनिरीक्षक राहूल कोळपे खराडी पो.स्टे. पुणे शहर, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे, अमोल ढोणे लोणीकंद पो.स्टे. यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

काळेपडळ पोलिसांचा धडाकेबाज छापा; १०३ गॅस सिलेंडरसह काळाबाजार करणारा जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर ! काळेपडळ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अवैद्य धंदे, अभिलेखावरील...

error: Content is protected !!