मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610
सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर !
कोंढवा पोलीस ठाणे, येथे मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली कोणताही अमली पदार्थ विक्री, बाळगला जाणार नाही अगर सेवन केला जाणार नाही याची विशेष मोहिम सुरू केली आहे. कोंढवा पोलीस ठाणे येथे गेल्या ०२ महिन्यांत अंमली पदार्थ विरोधात पोलीस ठाणे स्तरावर खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
१) मोक्का कारवाई यामध्ये कमेला शिवनेरी नगर, अश्रफनगर व इतर भागातील सराईत अंमली पदार्थ विक्रेते यांचे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून आरोपी अटक करण्यात आले आहेत.
२) एन. डी. पी. एस. अंतर्गत एकुण ०८ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये सुमारे ०५,०६,७८५/-रू किंचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामध्ये एकुण २१ जणांना अटक करण्यात आले आहे.
३) कोंढवा भागातील विविध ठिकाणी शोध मोहिम घेवून २१ एनडीपीएस चे सेवनार्थी यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
४) दि. १७/०८/२०२६ रोजी अंमली पदार्थ विक्रीच्या हॉटस्पॉटवर कोंढवा पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांनी गस्त करून गांजा खरेदी करण्याकरीता आलेल्या तब्बल ६१ जणांना ताब्यात घेवून त्यांना त्यांना पोलीस ठाणे येथे घेवून त्यांना अंमली पदार्थामुळे होणारी शरीराची हानी याबाबत समुपदेशन करून त्यांचे मनपरिवर्तन करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. असे ०२ महिन्यांत एकुण १०९ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे.
यापुढेही कोंढवा पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध अंमली पदार्थ विक्री, अंमली पदार्थ बाळगणे. अंमली पदार्थाचे सेवन याबाबत कठोर पावले उचलण्यात येण्यात असून नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपण राहत असलेल्या परिसरामध्ये आपणास अंमली पदार्थ विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास कोंढवा पोलीस ठाणे येथे तात्काळ संपर्क करावा.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























