Homeक्राईमगुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  *

! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर !

मा. वरिष्ठांनी पुणे शहर आयुक्तालयात विना परवाना शस्त्र बाळगणा-या, रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.

त्याअनुषंगाने दिनांक २७/०७/२०२५ रोजी खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील सहा पोलीस निरीक्षक प्रसन्न ज-हाड व पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सचिन माळवे, सोमनाथ कांबळे तसेच दयानंद तेलंगे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गोकुळनगर, नन्हे पुणे भागात एक इसम बेकायदेशीर पिस्टल विक्रीसाठी आलेला असून त्याच्याकडे ३ ते ४ पिस्टल आहेत. सदर मिळालेली बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक १, श्री. महेश सागडे यांना सांगितली असता त्यांनी बातमीचे अनुषंगाने खात्री करणेबाबत सुचना दिल्या. दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली शिताफीने व नियोजनबद्ध पद्धतीने शोध मोहिम राबवून गोकुळनगर, नन्हे, पुणे परिसरातून भुषण उत्तम मोहिते, वय २३ वर्षे रा. ओम साई ऑर्चिड, प्लॅट नं १०६, धायरी पोकळे वस्ती, पुणे ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४ गावठी पिस्टल व त्याचे मॅगझीनमध्ये ०३ जिवंत काडतुसे असे एकूण २,००,६००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आलेने जप्त करण्यात आला आहे. सदर ताब्यात घेतलेल्या आरोपी भुषण उत्तम मोहिते याच्याकडे विचारपूस केली असता त्याने महेश कांबळे रा. गुजरवाडी, पुणे याच्याकडून पिस्टल विक्रीसाठी आणले आहेत असे सांगितले.

त्याप्रमाणे नमुद आरोपी विरूद्ध न-हे पो स्टे गु.र.नं. १९४/२०२६ आर्म अॅक्ट कलम ३(२५), ५(१) (अ) सह कलम २५ (१) (अ), म.पो.का. क. ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास नन्हे पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. गौहर हसन, मा. सहायक पोलीस आयुक्त १, गुन्हे शाखा, श्री, शैलेश संखे, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १, पोलीस निरीक्षक श्री. महेश सागडे यांचे सुचनांप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक प्रसन्न ज-हाड, व पोलीस अंमलदार रणजित फडतरे, रहिम शेख, सोमनाथ कांबळे, बाबासाहेब दांगडे, दयानंद तेलंगे पाटील, सचिन माळवे, प्रमोद पवार, किरण मोरे, सुहास जगताप यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!