संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर
मा.पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांनी फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीमधील रेड अलर्ट एरिया मध्ये रात्री उशीरापर्यंत अंमली पदार्थ विक्री तसेच सेवन करण्याऱ्या इसमाचा शोध घेवुन त्यावर सशक्त कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. त्याअनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी श्री प्रशांत भस्मे, यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना महत्वाच्या सुचना व आदेश दिले होते.
दिनांक १६/०७/२०२५ रोजी फरासखाना पोलीस स्टेशन येथील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी सतर्क पेट्रोलींग करीत असतांना पोलीस अमंलदार नितीन तेलंगे व गजानन सोनुने यांना गोपनीय बातमी प्राप्त झाली की, बँगलोर राज्य कनार्टक येथील एक इसम दिनांक १७/०७/२०२५ रोजी पहाटे ०४.३० ते ०५.०० वाजण्याचे सुमारास अंमली पदार्थ युक्त याबा गोळया विक्रीसाठी रेड अलर्ट एरियामधील कॅसेट गल्ली येथे येणार असुन, त्याचेजवळ अंमली पदार्थ युक्त याबा नावाच्या बऱ्याच गोळ्या आहे. सदर प्राप्त बातमीच्या अनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी श्री प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अरविंद शिंदे पोलीस उप-निरीक्षक यांचे अधिपत्याखाली छापा कारवाई करण्यासाठी एक टिम तयार करुन, त्यांना कारवाई संदर्भात योग्य ते मार्गदर्शन व सुचना देण्यात आल्या होत्या.
दिनांक १७/०७/२०२५ रोजी पहाटे ०५.०० वा. चे सुमारास छापा कारवाई टिमने यशस्वी पणे सापळा लावुन, अंमली पदार्थ युक्त याबा गोळी विक्री साठी घेवुन आलेला इसम नामे निशान हबीब मंडल, वय ४७ वर्षे, रा. मुळ रा. नं. ९/३ बी आर रेसीडेन्सी सेकन्ड क्रॉस गणेश मंदिरराचे मागे, एन जी आर ले आऊट रुपेन्ना अग्रहरा बँगलोर राज्य कनार्टक यास ताब्यात घेवुन त्यांच्या अंगझडती दरम्यान अंमली पदार्थ युक्त ७५.३६ ग्रॅम वजनाच्या ७१८ नग (याबा) नावाच्या गोळ्या व गुन्हयात वापरलेली दुचाकी मोपेड गाडी, चार मोबाईल फोन, व रोख रक्कम असा एकुण ६,५८,८६०/- रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. १४४/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क) या गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील अधिका तपास सहा. पोलीस निरीक्षक शितल जाधव ह्या करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त श्री. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त, श्री. कृषिकेश रावले पोलीस उप-आयुक्त, परि-१ पुणे, श्रीमती अनुजा देशमाने सहा.पो.आयुक्त फरासखाना विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रशांत भस्मे, पो.नि.(गुन्हे) श्री. अजित जाधव, म. सपोनि, शितल जाधव, पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, सपोफौ कुष्णा निढाळकर, महेबुब मोकाशी, पोलीस अंमलदार नितीन तेलंगे, तानाजी नांगरे, मोरे, गजानन सोनुने, नितीन जाधव, महेश राठोड, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, महेश पवार, अकबर कुरणे, शशीकांत ननावरे, खुट्टे, चेतन होळकर, प्रशांत पालांडे, संदिप लोंढे महिला पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, रेखा राऊत, अर्चना ढवळे, भालेराव, बनसोडे, यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























