Homeक्राईमसिंहगड रोड पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी रेकॉर्ड वरील दोन विधीसंघर्षित...

सिंहगड रोड पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी रेकॉर्ड वरील दोन विधीसंघर्षित बालकाकडुन दोन पिस्टल व एक जिवंत काडतुस तसेच एका आरोपीकडुन एक पिस्टल केले जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर

दि. ०४/०७/२०२५ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी संतोष भांडवलकर, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार/९१८३ ओलेकर, पोलीस अंमलदार/८२९७ झगडे,पोलीस अंमलदार / १०१३८ पोलीस अंमलदार / ८६०० चव्हाण, पोलीस अंमलदार/४२७६ भोरडे, पोलीस अंमलदार/८८८५ कांबळे, पोलीस अंमलदार/०३ मोहिते असे सिंहगडरोड पोलीस स्टेशन हद्दीत मा.वरिष्ठांचे आदेशाने गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार / विनायक मोहीते राहुल ओलेकर, व गणेश झगडे यांना त्याचे खास बातमीदारामर्फत बातमी मिळाली की, सिंहगडरोड कॉलेजचे क्रिकेट ग्राउंड बाजुस वडगाव पुणे येथे सार्वजिनक रोडचे कडेला एक इसम संशयीत रित्या थांबलेला असुन, अशी खात्रीशीर बातमी मिळल्याने सदरची बातमी ही आम्ही आमचे सोबतचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, यांना कळविली असता, त्यांनी सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व पोलीस निरीक्षक गुन्हे, सिंहगडरोड पोलीस ठाणे, पुणे शहर यांना कळविली असता, मा. वरिष्ठांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन पुढील योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर कार्यवाही करणे कामी वरिल स्टाफ सह असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन पाहणीकरता बातमीतील वर्णनाचा एक इसम हा सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसल्याने त्यास पकडुन त्याचे कडे जागीच नाव पत्ता विचारता तो विधीसंघर्षित बालक असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही लागलीच

पंचासमक्ष त्याची अंगझडती घेता त्याचे उजवे बाजुचे कंबरेस जिन्स पॅन्टच्या आत मध्ये ४०,०००/-रु किंमतीचे एक पिस्टल व १०००/- रू किंमतीचे एक जीवंत काडतुस मिळुन आल्याने त्याचेकडे अधिक चौकशी करता, त्याने सदरचे पिस्टल व जींवत काडतुस हे पोलीस स्टेशन चे रेकॉर्ड वरील विधीसंघर्षित बालकाकडुन घेतल्याचे निष्पन्न झाल्याने सदर विधीसंघर्षित बालकाचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे पिस्टल बाबत अधिक तपास केला असता, त्याने सांगितले की, मी काही दिवसापुर्वी एकुण तीन पिस्टल आणले होते. त्यामधील एक पिस्टल वरिल विधीसंघर्षित बालकाकडे दिले होते एक माझे जवळ ठेवले होते व एक पिस्टल माझे ओळखीचा अनिकेत सोनवणे रा. तुळजापुर यास दिले होते. असे सांगितल्याने अनिकेत सोनवणे रा. तुळजापुर जि. धाराशिव याचा त्याचे प्राप्त पत्यावर जावुन शोध घेतला असता, तो मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अनिकेत महादेव सोनवणे वय २६ वर्षे रा.सिध्दार्थ नगर तुळजापुर जि. धाराशिव असे असल्याचे सांगितल्याने त्याचा तुळजापुर येथे जावुन शोध घेतला असता, तो मिळुन आल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करुन त्याचेकडुन एक ४०,०००/- रू किंमतीचे पिस्टल जप्त करण्यात आले असुन सदर गुन्हयात एकुण तीन पिस्टल व एक जींवत काडतुस असा एकुण १,२१,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत.
तसेच सिंहगडरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ३३६ / २०२५ बीएनएस कलम ३०८ (३), ३(५) मधील रेकॉर्ड वरील पाहिजे आरोपी नामे दादया मोरे, किरण शिंदे रा. वडगाव बु पुणे यांचा तपास पथकातील अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना रेकॉर्ड वरील व तडापीर आरोपी नामे किरण विठ्ठल शिंदे वय २३ वर्षे रा. जे.एस.पी.एम कॅम्पस जवळ, कृष्णकुंज अपार्टमेट तीसरा मजला, पुणे याचा शोध घेवुन त्यास दाखल गुन्हयात अटक करुन त्याचेकडुन एक पिस्टल व दोन जींवत काडतुस जप्त करण्यात आले असुन दाखल गुन्ह्याचा पुढील तपास समीर कदम सहायक पोलीस निरीक्षक सिंहगडरोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. श्री रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. राजेश बनसोडे, अप्पर पोलीस आयुक्त सो, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. संभाजी कदम सो, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ – ३,पुणे शहर श्री. अजय परमार सो, सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर श्री. दिलीप दाईंगडे सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. उत्तम भजनावळे सोो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, देवा चव्हाण, गणेश झगडे, विनायक मोहीते, राहुल ओलेकर, सागर शेडगे, निलेश भोरडे, तानाजी सागर, संदिप कांबळे, समीर माळवदकर, सतिश मोरे, यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!