Homeक्राईमविश्रामबाग पोलिसांची मोठी कामगिरी – दिल्ली-उत्तर प्रदेशातील घरफोडी टोळी अटकेत.

विश्रामबाग पोलिसांची मोठी कामगिरी – दिल्ली-उत्तर प्रदेशातील घरफोडी टोळी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर !

विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुरनं ११ / २०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३) अन्वये फिर्यादी हे घरात नसताना अज्ञात आरोपींनी घराचा दरवाजा तोडुन चोरी केल्याने गुन्हा करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास करणे बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी तपास पथकाचे अधिकारी राजेश उसगावकर सहायक पोलीस निरीक्षक यांना आदेश केल्याने त्यांनी तपास पथकातील अंमलदार यांना सदर गुन्हा उघडकीस आणेबाबत नियोजन करुन योग्य सुचना दिल्या. त्यावरुन तपास पथकातील सर्व अंमलदार यांनी घटनास्थळापासुन सीसीटीव्हीच्या माध्यामातुन संपुर्ण पुणे शहरात संशयीत आरोपींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीचे चित्रीकरण आशिष खरात व अनिस शेख यांनी पाहिले असता त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे सह पुण्यातील इतर ठिकाणीही चोऱ्या केल्याचे निष्पन्न असुन संशयीत आरोपी हे पुणे रेल्वे स्टेशन परिसरा पर्यंत पोहचले. त्यानंतर ते पुणे स्टेशन जवळील एका लॉजवर राहिले होते व तेथुन परराज्यात निघुन गेले असल्याचे समजले.
सदर आरोपी हे परराज्यातील असल्याने त्यांचा शोध घेणे खुप अवघड होते. परंत आशिष खरात व अनिस शेख यांनी सदर परिसरात सतत वेशांतर करुन संशयीत आरोपीवरती पाळत होती. त्यांना एक महिन्यानंतर गोपनिय बातमीदारां मार्फत सदरचे सीसीटीव्ही फुटेज मधील संशयीत आरोपी हे पुन्हा विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये घरफोडी करण्याच्या उद्देशाने आले असुन ते ओंकारेश्वर मंदीर जवळ थांबले आहेत. आशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याची खात्री झाल्यानंतर तपास पथकांने सदर ठिकाणी जावुन संशयीत आरोपींना संशय येणार नाही या पध्दतीने त्यांच्याजवळ जावुन एकत्रीत चारही बाजुनी घेरुन त्यांना दिनांक २३/०२/२०२६ रोजी ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव पत्ता १) आकाश सुभाष वय २३ वर्षे, सध्या पत्ता गल्ली नंबर ०१ एच ब्लॉक, सुंदरनगरी, दिल्ली, मुळ पत्ता. बाबा मोहनराम मंदिरवाली गल्ली नंबर ०२, नई वस्ती, मेरठ उत्तर प्रदेश २) जितेंद्र चर्तुवेदी, वय ३२ वर्षे, रा. ई ५७, बी १३५ सुंदरनगरी दिल्ली असे सांगितल्याने त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने त्यांना नमुद गुन्हयात अटक करुन अधिक तपास केला असता त्यांनी दोन दिवसांपुर्वी चोरी केलेले दागिने पुणे रेल्वे स्टेशन परिसराजवळ असलेल्या लॉज वर ठेवले असल्याचे सांगितले. त्यामुळे तपास पथक यांनी वरिष्ठांच्या आदेशाने आरोपी राहत असलेल्या लॉजवर जावुन चेक केले असता त्याठिकाणी ३२ तोळे सोने व १२५ ग्रॅम चांदी लपवलेली मिळुन आली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी जानेवरी महिन्यात विश्रामबाग पोलीस ठाणे सह इतर तीन ठिकाणी चोरी केल्याचे सांगितले. त्यांना मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक ०६/०३/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली. सदर चोरीतील दागिने हे दिल्ली, उत्तर प्रदेश येथे लपवले असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी सपोनि राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार अशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड व आरोपी यांच्यासह टिम रवाना होवुन दिल्ली व उत्तर प्रदेश येथे तपासा दरम्यान आरोपीनामे आकाश सुभाष रेकॉर्डवरील आरोपी असुन तो सनी गँगशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले असुन आकाश सुभाष याच्यावर खालील प्रमाणे आहेत :-
१) कोतवाली पोलीस ठाणे गाजियाबाद उत्तर प्रदेश गुरनं २९१ / २०१८ भादवि कलम ३०२, ३४ प्रमाणे.

२) ट्रांस हिण्डन इन्द्रापुरम पोलीस ठाणे गाजियाबाद उत्तर प्रदेश गुरनं २२९७/२०१९ भादवि कलम ३०७, ३४ प्रमाणे

३) कविनगर पोलीस ठाणे गाजियाबाद उत्तर प्रदेश गुरनं १७८३/२०१९ भादवि कलम ३०२, ३४ प्रमाणे

४) ट्रांस हिण्डन इन्द्रापुरम पोलीस ठाणे गाजियाबाद उत्तर प्रदेश गुरनं ६०७ / २०२० उत्तर प्रदेश गिरोहबन्द समाज विरोधी क्रियाकलाप (गँगस्टर अॅक्ट) अधिनियम कलम २, ३ प्रमाणे इत्यादी गुन्हे असुन लोकल पोलीसांची मदत घेवुन उत्तर प्रदेश येथुन नमुद गुन्हयातील व इतर दोन गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस राजेश उसगावकर सहायक पोलीस निरीक्षक करीत आहेत.

नमुद आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी पुणे शहरात एकुण ०५ ठिकाणी दिवसाच्या व रात्रीच्या घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले असुन त्यामधील खालील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन ते गुन्हे खालील प्रमाणे-

विश्रामबाग पोलीस ठाणे गुरनं व कमल विश्रामबाग पो. ठाणे गुरनं ११/२०२६ समर्थ पो. ठाणे गुरनं २४/२०२६ सोने व चांदी जप्त.

सदरची कारवाई मा पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त श्री राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री कृषीकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त, श्री चंद्रकांत भोसले, श्री प्रदिप कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी राजेश उसगावकर सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, कैलास डुकरे, जाकीर मणियार, आशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, सागर मोरे, अर्जन थोरात, नितीन बाबर, अर्जुन कुडाळकर यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!