Homeक्राईमगुन्हे शाखा युनिट ७ ची धडक कारवाई : बेकायदेशीर गर्भलिंगनिदान रॅकेट उध्वस्त,...

गुन्हे शाखा युनिट ७ ची धडक कारवाई : बेकायदेशीर गर्भलिंगनिदान रॅकेट उध्वस्त, ७.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट ७, गुन्हे शाखा, पुणे शहर !

बेकायदेशीररित्या गर्भलिंगनिदान होत असलेबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे दि. ०४/०३/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट -७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व स्टाफ असे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले, जिल्हा पुणे, सचिन धस, वैदयकीय अधिक्षक, ग्रामीण रूग्णालय, शिरूर पुणे व सोबत पंच असे बातमीप्रमाणे एजंट नरेंद्र ठाकरे, रा केसनंद याने दिलेल्या माहिती प्रमाणे डमी पेशंट सह खाजगी व सरकारी वाहनाने कारेगाव, रांजणगाव एमआयडीसी येथे गेले असता तेथे एजंट नरेंद्र ठाकरे याने डमी पेशंट व तिचे पती यांना आपले खाजगी गाडी मध्ये घेऊन जावुन लाईफ केअर क्लिनिक, पाचंगे वस्ती, ढोकसांगवी, रांजणगाव येथे आणले. प्राप्त लाईव्ह लोकेशन प्रमाणे सर्व स्टाफने पंचांसह लाईफ केअर क्लिनिक येथे छापा टाकुन कारवाई केली असता आरोपी इसम नामे आकाश सुभाष मलगुंडे, वय ३५ वर्षे, रा. धनगरवाडा, ढोकसंगवी, ता. शिरूर, जि. पुणे हा डमी महिला पेशंट हिची छोटया प्रोब जो मोबाईल ला वायफाय ने कनेक्ट करून मोबाईल अॅप द्वारे सोनोग्राफी करताना मिळुन आला. त्याचे सोबत आरोपी एजंट नरेंद्र साहेबराव ठाकरे वय ५२ वर्षे, रा. ग्रामपंचायत जवळ, केसनंद गाव, समर्थ पार्क, ता. हवेली, जि. पुणे हा मिळुन आला असुन सदर क्लिनिक मध्ये व एजंट चे गाडीमध्ये गर्भलिंगनिदान करण्याचे साहित्य व गर्भपात करण्यासाठी उपयोगात येणारे औषधे मिळुन आली आहेत. सरकारी पंच, सिव्हिल सर्जन, स्थानिक वैदयकीय अधिकारी यांचेसह पंचनामा कारवाई करण्यात आली असुन सदर कारवाईमध्ये वॅगनार गाडी, गर्भलिंगनिदान करण्याचे साहित्य व गर्भपात करण्यासाठी उपयोगात येणारे औषधे असा एकुण ७,७३,०७५/-रू.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -७ चे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांचे सुचनेप्रमाणे गुन्हे शाखा युनिट -७ कडील सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, गिरीष नाणेकर, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, निर्णय लांडे, विनायक साळवे, नितिन धाडगे, बाळासाहेब तनपुरे व भरत गुंडवाड, तसेच महिला पोलीस अंमलदार नेहा तापकीर, प्रतिक्षा पानसरे, सोनाली नरवडे व कीर्ती मांदळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!