मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610
सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *
! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर !
चंदननगर पोलीस स्टेशन गु. र. नं.२८७/२०२६ भा. न्याय संहिता २०२३ चे कलग भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११९ (२), ११७ (२), ३(५) मधील फिर्यादी यांनी तक्रार दिली की, दि.०९/०६/२०२६ रोजी वेलकम किराणा स्टोअर्स समोरील रोडवर, लेन नंबर ०२, बोराटे वस्ती, चंदननगर पुणे या ठिकाणी फिर्यादी यांचे पती भारत गॅस चा सिलेंडर खरेदी करण्यासाठी गेले असता तेथील रोडवरुन काळ्या रंगाची स्कुटी नंबर ८०९३ वरुन जाणारे तीन अनोळखी इसमापैकी दोन मुले व एक मुलगी यांचा फिर्यादीचे पतीस धक्का लागल्याने त्यांनी सदर इसमांना गाडी निट चालवा असे म्हणाले असता त्याचा राग येवुन त्यागाडीवरील दोन अनोळखी मुलांनी फिर्यादीचे पतीस लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी करुन त्यांचे जवळील ०८,०००/- रु. किं.चा मोबाईल फोन जबरस्तीचे घेऊन गेले म्हणून तक्रार दिल्याने वरील प्रमाणे गुन्हा चंदननगर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे.
सदरचे गुन्ह्याचे घटनास्थळावरील तसेच आजु बाजुचे चौकामधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी चंदननगर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली असता सदरचे गुन्ह्यामधील आरोपींनी वापरलेले गाडीचा नंबर एम. एच. १२ एफ. एस. ८०९३ असा असल्याचे निष्पन्न झाले. सदरचा गुन्हा गाडीचे मालकाचा मुलगा अनिश संदिप सावंत वय २० वर्षे रा. ७/३९, प्रेमनगर, स्टेला मेरी शाळेच्या जवळ, वडगावशेरी, पुणे व त्याचा मित्र वेदांत विजय देशमुख वय २१ वर्षे रा. आय. व्ही. इस्टेट, बोटानिका बिल्डींग डी-१०२, वाघोली, पुणे यांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपींना अटक करुन पुढील तपास केला असता यातील आरोपींनी सदरचे गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी व त्यांनी जबरदस्तीने काढुन नेलेले मोबाईल फोन असा एकुण ३८,०००/- रु. किं. मुद्देमाल हस्तगत करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. गणेश जगदाळे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०७, पुणे शहर डॉ. प्रशांत अमृतकर, मा. सहा. पोलीस आयुक्त. खराडी विभाग, श्रीमती नुतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन श्रीमती. अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. अमोल धस यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. गणेश जगदाळे, तसेच तपास पथकाचे रमेश मेमाणे, अमरसिंग डांगे, विकास कदम, रामदास घावटे, किरण घुटे, ज्ञानोबा लहाणे, चंद्रकात पाटील व सशिल बेंद्रे यांनी केली.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























