Homeक्राईमलोहगडवरील ‘अपघात’ निघाला खून; होणाऱ्या पत्नीने प्रियकरासह रचला कट, दोघे अटकेत.

लोहगडवरील ‘अपघात’ निघाला खून; होणाऱ्या पत्नीने प्रियकरासह रचला कट, दोघे अटकेत.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! स्थानिक गुन्हे शाखा, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण !

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत रजिस्टर नं. ३६/२०२६ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे दि. १८/०६/२०२६ रोजी दाखल करणेत आले आहे. सदर प्रकरणात दि. १८/०६/२०२६ रोजी १३/३० वा सुतास लोहगड किल्ल्याचे पश्चिम बाजुस झुडपामध्ये इसम नामे केतन विशाल अगरवाल, वय २५ वर्षे रा. लोढा बेलमॅडन्डो टॉवर गहुंजे, ता. मावळ जि.पुणे याचा मृतदेह मिळून आला होता. केतन अगरवाल याचे सिया गोयल रा. मार्केट यार्ड पुणे हिचे सोबत लग्न ठरविले होते. त्यामुळे दोघे जण लोहगड किल्ल्यावर फिरायला आलेनंतर किल्ला फिरताना केतन अगरवाल याचा पाय घसरल्यानंतर किल्ल्यावरून खाली पडुन त्याचा मृत्यू झाला. अशी माहिती सिया गोयल हिने दिल्यामुळे हर्ष कुलदीप अगरवाल रा. लोढा बेलमॅडन्डो टॉवर गहुंजे, ता. मावळ जि. पुणे यांनी लोणावळा ग्रामीण पो स्टे येथे वरील प्रमाणे खबर नोंदविल्याने अकस्मात मयत प्रकरण नोंद करणेत आले होते.

सदरचे प्रकरणाबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण यांनी स्वतः जातीने लक्ष देवून सदर प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आणि सदर प्रकरणात समांतर सखोल चौकशी करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्याकरीता दोन विशेष पथकांची नियुक्ती करणेत आली.

सदरची घटना ही प्रथम दर्शनी संशयास्पद वाटल्याने पथकाने यामध्ये प्रॉपर्टी वाद अगर कोणता प्रेमसंबंधाचा प्रकार आहे का? याबाबत तपास सुरू केला. तपासादरम्यान मुलीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. त्यादरम्यान केतन विशाल अगरवाल याचे वडील श्री. विशाल देवीचंद अगरवाल वय ४६ वर्षे, रा. लोढा बेलमॅडन्डो टॉवर गहुंजे, ता. मावळ जि.पुणे यांनी सिया प्रविण गोयल रा. मार्केट यार्ड पुणे हिचे चेतन चौधरी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याचे सोबत प्रेमसंबंध असल्याने त्यांनी संगणमत करून केतन विशाल अगरवाल यास लोहगड किल्यावरून ढकलून देवून त्यास जिवे ठार मारले आहे, अशी फिर्याद लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन गु.र.नं. १६८/२०२६ बी.एन.एस. १०३, ६१(२) प्रमाणे दि. २३/०६/२०२६ रोजी गुन्हा नोंद केला.

सदर गुन्हयातील मजकुराचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी चेतन बाबुलाल चौधरी, वय २२ वर्षे, रा. पार्श्वनगर, वी ४/३०१ कोंढवा बु।। ता. हवेली जि.पुणे याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले, त्याचेकडे तपास केला असता, चेतन चौधरी व सिया गोयल यांचे प्रेमसंबंध होते, परंतु सिया गोयल हिचे लग्न केतन अगरवाल याचे सोबत ठरविले होते, सिया गोयल हिस केतन अगरवाल याचेसोबत लग्न करावयाचे नव्हते आणि तो त्यांचे प्रेमसंबंधात आडकाठी आणत असल्याचे कारणावरून चेतन चौधरी व सिया प्रविण गोयल यांनी कट रचून सिया गोयल हिने केतन अगरवाल यास लोहगड किल्ल्यावर फिरण्यास नेले, आणि प्रियकर चेतन चौधरी यास पाठीमागून बोलावून घेवून केतन अगरवाल यास किल्यावरून ढकलून देवून त्याचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयाचे कामी सिया प्रविण गोयल वय २० वर्षे रा. लिलाकुंज, ७८/२१ न्यु एरा सोसायटी गंगाधाम समोर कोंढवा रोड, बिबवेवाडी, मार्केट यार्ड पुणे हिला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. शुभम कुमार, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजानन टोण्पे, लोणावळा उपविभाग, मा. पोलीस उप अधीक्षक (गृह) श्री राजेंद्र मायने, पो. मुख्यालय पुणे ग्रा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा ग्रामीण पो स्टे चे पो नि दिनेश तायडे स्था. गुशा. चे पोसई अभिजीत सावंत, लोणावळा ग्रामीण पोस्टे चे सपोनि मनोज पवार, स्था.गु.शा.चे पोलीस अंमलदार संतोष शेळके, तुषार भोईटे, गणेश होळकर, संजय पडयाळ, अजित भुजबळ, अमोल शेडगे, भारत मोहोळ, चेतन पाटील, गणेश धनवे, संतोष भापकर, वैभव सावंत, अजय देडे, भाउसाहेब पुंड, समीर तांगडे, महिला पोलीस अंमलदार नंदा कदम, सुजाता कदम, शरयु बिरंबुळे, लोणावळा ग्रामीण पो स्टे चे पोलीस अंमलदार जय पवार, सागर धनवे, अमोल कसबेकर, संजय पंडीत, प्रशांत तुरे, पवन कराड, सचिन गायकवाड यांनी केली असून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!