संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! युनिट – १, गुन्हे शाखा, पुणे शहर !
मा.वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे युनिट – १, गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व अंमलदार पुणे शहरात गुन्हयांना आळा घालण्याकामी गुन्हे प्रतिबंध करणेकामी हदीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार हेमंत पेरणे व पोलीस अंमलदार निलेश साबळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, पुणे शहर जबरी चोरी रेकॉर्डवरील आरोपी नामे अस्लम शेख उर्फ बिल्ला व रेहान शेख रा. म्हाडा कॉलनी हडपसर पुणे यांनी मिळून पुणे शहरात ब-याच ठिकाणी त्यांचे इतर साथीदारांसह जबरी चोरीचे गुन्हे केलेले आहेत. वरील मजकुराची माहीती मिळताच सदरची माहीती श्री. वाहीद पठाण पोलीस निरीक्षक अति. कार्यभार युनिट १ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी कळविली असता त्यांनी सदरबाबत खात्री करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेने त्यांचे पत्त्यावर जावून शोध घेतला असता दोन्ही संशयित इसम त्यांचे राहते घरी मिळून आले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव व पत्ता १) अस्लम इस्माईल शेख उर्फ बिल्ला वय २२ वर्ष रा. फलॅट नं ३०३, बिल्डींग नंबर ०३, नविन म्हाडा कॉलनी, ससाणे नगर, हडपसर पुणे २) रेहान जमील शेख उर्फ रिहान वय १९ वर्षे, रा. फलॅट नं ३१०, बिल्डींग नं २८, नविन म्हाडा कॉलनी, ससाने नगर रोड, हडपसर पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांनतर त्यास चौकशी कामी ताब्यात घेवुन युनिट-१ गुन्हे शाखा कार्यालय येथे घेवून येवून त्यांचेकडे गुन्ह्यांचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सुमारे ७ ८ दिवसांपूर्वी त्यांनी त्याचे साथीदारासोबत अॅक्टीवा मोपेड गाडी वरुन शांताई हॉटेल येथील चौक जवळ सोमवार पेठ पुणे येथे एका इसमाचे खिशातुन ३०,०००/- रुपये जबरदस्तीने काढुन घेतले होते. सदर बाबत समर्थ पोलीस स्टेशन कडून माहीती घेतली असता वरील घटनेचे अनुषंगाने समर्थ पोलीस स्टेशन गु. रजि नं. २१/२०२६ भा.न्या.सं कलम ३०४ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले.
तसेच आरोपी नामे अस्लम इस्माईल शेख उर्फ बिल्ला याचे कडे अधिक चौकशी केली असता त्याने इतर साथिदारांसोबत मिळून शरबतवाला चौक कॅम्प येथे एका इसमाचे पैसे चोरल्याचे सांगितले. सदरबाबत लष्कर पोलीस स्टेशन येथे लष्कर पोलीस स्टेशन गु. रजि. नं. २६/२०२६ भा.न्या. सं कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजल्याने त्या गुन्हयाची देखील उकल करण्यात आली. अस्लम इस्माईल शेख उर्फ बिल्ला या सराईत आरोपीवर पुणे शहरात एकुण २१ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १ श्री शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट – १, वाहीद पठाण यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक राहुल मखरे, पोलीस अंमलदार निलेश साबळे, हेमंत पेरणे, अनिकेत बाबर, मयुर भोसले व उमेश मठपती तसेच महिला पोलीस अंमलदार ज्योती मुल्का यांनी केली.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























