Homeक्राईमविश्रामबाग पोलीस स्टेशनची कारवाई: बसमधील गर्दीत सोन्याची चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद.

विश्रामबाग पोलीस स्टेशनची कारवाई: बसमधील गर्दीत सोन्याची चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक ०२/०२/२०२६ रोजी ०१.३० वा. ते ०२.१५ वाजताचे दरम्यान आंबेडकर चौक, जकात नाका वारजे बसस्टॉप ते शनिवारपेठ दरम्यान बसने प्रवास करीत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बसमधील गर्दीचा फायदा घेवुन फिर्यादी यांचे उजव्या हातातील ३५,०००/- रु. की. ची सोन्याची पाटली चोरून नेलेबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १७ / २०२६ भा. न्या. सं कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत प्रभारी प्रदिप कसबे यांनी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी अंमलदार यांना सुचना दिल्यानंतर तपास पथकातील राजेश उसगावकर, सहा. पोलीस निरीक्षक व अंमलदार तपास करीत असताना पोलीस अंमलदार अर्जुन थोरात यांना सीसीटीव्ही पाहुन संशयित आरोपींची माहिती मिळाल्याने तसेच विश्रामबाग तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना गोपनीय बातमी मिळाल्याने सदरचा गुन्हा १) बसवराज विजय सुतार, वय २५ वर्षे, रा. र्पोटेक क्लासेस शेजारी, केशव नगर पोलीस चौकी जवळ, केशवनगर मुढंवा पुणे ३६, २) कृष्णा रमेश माने, वय ४५ वर्षे, रा. सरोदय कॉलनी, दर्गाचे मागे, मुढंवा पुणे, यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणुन तपास केला असता आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले तसेच सदर आरोपीतांकडे अधिक तपास केला असता त्यांचेकडून एकूण ०५,८७,००८/- रु.की.चे ४०.०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने हस्तगत करण्यात आले असून एकुण ०३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१, श्री कृषीकेश रावळे, सहायक पोलीस आयुक्त, श्री चंद्रकांत भोसले, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री प्रदिप कसबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री अरुण घोडके, यांच्या सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक, राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, आशिष खरात, सागर मोरे, राहुल मोरे, शिवदत्त गायकवाड, अनिस शेख व अर्जुन थोरात तसेच महिला पोलीस अंमलदार रेणुका पठारे व स्वाती बर्डे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!