संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! खराडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !
खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीमध्ये बुलेट गाडीवरून फिरणारे तरूण मुल बुलेट गाडयांना असणारे मुळ कंपनीचे सायलेन्सर बदलुन त्या जागी दुसरे मॉडीफाईड सायलन्सर बसवुन त्यातुन फटाक्याचा मोठा व कर्णकर्कश असा आवाज करून रहिवाशांना त्रास होईल असे वर्तन करीत असले बाबतचे मोठ्या प्रमाणावर रहिवासी नागरीकांकडून वेळोवेळी तक्रारी प्राप्त झालेल्या असून, त्या अनुषंगाने तसेच सदर बुलेट स्वार व चालक यांचेकडून मोटार वाहन कायदयाचे उल्लंघन होवुन नागरीकांना त्रास होत असल्याने खराडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनांप्रमाणे खराडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी राहुल कोळपे पोलीस उपनिरीक्षक व तपास पथकाचे अंमलदार महेश नाणेकर, सचिन पाटील, विलास केदारी, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव यांनी वेळोवेळी हद्दीमध्ये पेट्रोलींग दरम्यान सापळे रचुन फटाके फोडुन कर्णकर्कश आवाज करणारे ४५ बुलेट गाडया व इतर दुचाकी गाड्यांसह पकडले असून त्यांचेवर मोटार वाहन अधिनियम कायदया अंतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांचे गाडयांचे मॉडीफाईड सायलेन्सर काढुन गाडयांना कंपनीचे मुळ सायलेन्सर बसविण्यात आले. मॉडीफाईड सायलेन्सर वर बुलडोझर चालवुन नष्ट करून हद्दीमध्ये उच्छाद करणा-या बुलेटस्वार यांचेवर चाप बसविणेत आलेला आहे. भविष्यात खराडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटारसायकलस्वार फटाके फोडुन कर्णकर्कश आवाज करीत असताना मिळुन आल्यास नागरीकांनी खराडी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडुन करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर,श्री मनोज पाटील मा.पोलीस उपआयुक्त, झोन ७ पुणे शहर, श्री सोमय मुंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, खराडी विभाग, श्रीमती प्रांजली सोनवणे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक खराडी पो.स्टे. श्री संजय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, राहुल कोळपे पोलीस अंमलदार महेश नाणेकर, नवनाथ वाळके, सचिन पाटील, साहेबराव गुंडाळे, संतोष लवटे, विलास केदारी, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव यांनी केली .

मुख्य संपादक : – इमरान शेख


























