Homeक्राईमपोलीसांवर हल्ला करून फरार झालेला सराईत आरोपी अखेर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५...

पोलीसांवर हल्ला करून फरार झालेला सराईत आरोपी अखेर जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-५ व खंडणी विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

पोलीसांवर हमला करणाऱ्या सराईत आरोपीस पाठलाग करुन युनिट ५. व खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी जेरबंद केलेबाबत. ”

दिनांक २१/०६/२०२६ रोजी बाणेर पोलीस स्टेशन कडील पथक हे घरफोडीच्या गुन्हयामधील निष्पन्न आरोपीचा पाठलाग करत रामटेकडी, हडपसर पुणे येथे आले असताना आरोपी नामे बिंतुसिंग श्यामसिंग कल्याणी व करणसिंग रजपुतसिंग दुधाणी हे दुचाकी गाडीवर पळुन जात असताना आरोपी बिंतुसिंग श्यामसिंग कल्याणी हयाने पोलीस पथकाच्या अंगावर दुचाकी गाडी घालुन व आरोपी नामे करणसिंग दुधाणी याने त्याच्याकडे असलेल्या धारदार हत्याराने बाणेर पोलीस स्टेशन कडील पथकावर हमला केला असता सहा. पोलीस निरीक्षक गणेश रायकर हे जखमी झाले व त्यामुळे त्यांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या फायरिंग मध्ये करणसिंग दुधाणी हा जखमी झाला. आरोपी नामे बिंतुसिंग कल्याणी दुचाकीवरुन तेथुन पळुन गेला होता. त्याचा आम्ही गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर व खंडणी विरोधी पथक २. पुणे शहर असे संयुक्तीक समांतर शोध घेत होते.

आरोपी बिंतुसिंग कल्याणी याचा शोध घेत असताना पोलीस हवालदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखिले व शशिकात नाळे यांना खबर मिळाली की, आरोपी बितुसिंग कल्याणी हा बोरीऐंदी गावाच्या शिवारात लपुन बसला असुन तो पुणे जिल्हा सोडुन पळून जाणार आहे याप्रमाणे मिळालेल्या बातमीवरुन मा. वरिष्ठांचे परवानगीने गुन्हे शाखेकडील पोलीस पथक बोरीऐंदी या ठिकाणी पोहचले असता दरेकरवाडी रोड, बोरीऐंदी, ता. हवेली, जि.पुणे या ठिकाणी रोडच्या लगद आरोपी बिंतुसिंग कल्याणी हा एका इसमासह उभा असलेला दिसला तेव्हा त्याचा पाठलाग करुन चारही बाजुने घेरुन पळुन जात असताना त्यांना पकडले व त्यांचे नावे विचारले असता त्यांनी त्यांचे नावे १) बिंतुसिंग श्यामसिंग कल्याणी, वय. ३० वर्षे, रा. कोठारी व्हील्स शेजारी, रामटेकडी, हडपसर, पुणे २) हसपालसिंग नेपालसिंग कल्याणी, वय-३५, रा. अल्फा पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, सोरताप वाडी, पुणे असे असल्याचे सांगितले. अधिक चौकशी केली असता, आरोपी बिंतुसिंग कल्याणी यास हसपालसिंग याने व निहालसिंग रामजसिंग कल्याणी, रा. कोठारी व्हील्स शेजारी, रामटेकडी, हडपसर, पुणे यांनी गुन्हा केल्यानंतर गुन्हयाची माहिती असताना त्यांनी आरोपीस पळुन जाण्यास मदत केली असल्याचे समजले. त्यावरुन हसपालसिंग कल्याणी व निहालसिंग कल्याणी यांना ताब्यात घेतले आहे व बिंतुसिंग श्यामसिंग कल्याणी याच्यासह पुढील कार्यवाही करीता वानवडी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले असुन अधिक तपास वानवडी पोलीस स्टेशन करीत आहेत. आरोपी बिंतुसिंग कल्याणी हा पोलीस अभिलेखावरील आरोपी असुन त्याच्याविरुध्द शरिराविरुध्द व मालाविरुध्दचे जवळपास २५ गुन्हे दाखल आहेत. हसपालसिंग कल्याणी याच्यावर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो. श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त सो. श्री. संजय दराडे, मा. अपर पोलीस आयुक्त सो.. गुन्हे श्रीमती. तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त सो. गुन्हे श्री. गौहर हसन, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. शैलेश संख्ये यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे, पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार शहाजी काळे, शशिकांत नाळे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अकबर शेख, सुधीर सोनवणे, नासेर देशमुख, परमेश्वर कदम, नेत्रिका अडसुळ, सर्व नेमणुक गुन्हे शाखा युनिट ५. पुणे शहर व पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, पवन भोसले सर्व नेमणुक खंडणी विरोधी पथक २, पुणे शहर यांचे पथकाने केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मारहाण करून मोबाईल लुटणाऱ्या दोघांना चंदननगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

शासनबंदी असलेल्या विमल पान मसाल्याचा साठा उघड; ६.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा बुगा...

पुणे ते झारखंड: कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मुलगी सुखरूप ताब्यात, फेक किडनॅपिंग रॅकेटवर गुन्हा...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दिनांक १८/०६/२०२६...

कोंढवा पोलीस स्टेशन हदिदतील आरोपी कडुन किंमत रु. २४,२००/- रु.कि.चा गांजा अंमली पदार्थ जप्त...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * कोंढवा पुणे परिसरात अंमली पदार्थ विक्रीच्या अनुशंगाने कारवाई...

कामाच्या बहाण्याने घरात घुसून चोरी करणा-या परप्रांतीय आरोपीस मध्यप्रदेश मधून बिबवेवाडी पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! बिबवेवाडी पोस्टे...

error: Content is protected !!