Homeक्राईमपुणे ते झारखंड: कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मुलगी सुखरूप ताब्यात, फेक किडनॅपिंग...

पुणे ते झारखंड: कोंढवा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मुलगी सुखरूप ताब्यात, फेक किडनॅपिंग रॅकेटवर गुन्हा दाखल.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक १८/०६/२०२६ रोजी सायंकाळी ०४/०० वा चे सुमारास पिडीत फिर्यादी रा. काकडे वस्ती, कोंढवा बु. पुणे, मुळ रा. बिहार यांची पिडीत अपहृत मुलगी वय १७ वर्ष हिस कोणीतरी अज्ञात इसमाने लबाडीचे इराद्याने आमचे कायेदशीर रखवालीतुन फुस लावुन पळवुन नेले. म्हणुन कोंढवा पोलीस ठाणे पुणे गु.र.नं. ४७४/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास पथाकाकडील पोलीस स्टाफ सिसीटीव्ही फुटेजचे आधारे पिडीत मुलीचा शोध घेत होते त्यादरम्यान फिर्यादी नवल किशोर मंडल यांना त्याचे मोबाईल क्रमांकावर अनोळखी इसमांने व्हिडीओ कॉल करून तुम्ही पोलीस स्टेशन येथे काय करत आहात तुमची मुलगी आमचे ताब्यात आहे असे म्हणुन त्यांचे मोबाईलवर युपीआय स्कॅनर पाठवुन पैशांची मागणी केली असता फिर्यादी यांनी सदरबाबत पोलीस ठाणेस येवुन माहिती दिली सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी मा. वरिष्ठांना कळविली असता मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार यांनी सदर घटनेचे गांभीर्याने दखल घेवुन मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे व मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ५ यांना तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशीत केले असता त्यांनी घटनास्थळास भेट देवुन पिडीत मुलीचा शोध घेणेकामी टिम तयार करून त्यांना सुचना दिल्या.

त्यानंतर कोंढवा पोलीस तपास पथकाने तांत्रिक विश्लेषनावरुन पुणे रेल्वे स्टेशन येथे जावुन सिसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता पिडीत मुलगी ही आझाद हिंद एक्सप्रेस हावरा, कलकत्ता येथे जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसली असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ रेल्वे विभागाशी संपर्क करुन सदर रेल्वे माहिती घेतली. सदर रेल्वे ही टाटानगर जमशेदपुर (झारखंड) येथे थोडया वेळयात पोहचणार असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ टाटानगर जमशेदपुर (झारखंड) रेल्वे पोलीस व टि.सी. यांना संपर्क करून पिडीत मुलगीचा शोध घेण्यास सांगीतले असता पिडीत मुलगी ही आझाद हिंद एक्सप्रेस या रेल्वेमध्ये मिळुन आल्याने तिस रेल्वे पोलीस व टि.सी. यांचे टिमने सुखरूप ताब्यात घेतले. त्यानंतर तात्काळ कोंढवा पोलीस स्टेशनकडील पथक व फिर्यादी यांना टाटानगर, जमशेदपुर (झारखंड) येथे रवाना करून पिडीत मुलीस सुखरूप ताब्यात घेतले आहे. तसेच फिर्यादी यांना फेक अपहरणाचा व्हिडीओ कॉल करून पैशांची मागणी करणाऱ्या इसमांविरूध्द कोंढवा पोलीस स्टेशन ४७८/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३०८ (२), ३५१ (२) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री संजय दराडे, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे, श्री गौहर हसन, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे प्रशांत मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पो.हवा. ५७८९ रविंद्र चिप्पा, पो. हवा. ६९५१ विशाल मेमाणे, पो. हवा. २८३ अमोल हिरवे, पो.अं. ८८३४ पुष्पेंद्र चव्हाण, पो.अं. ९८३८ संतोष बनसुडे, पो.अं. ४९० सुरज शुक्ला, पो.अं. ५८६५ अमित सुर्यवंशी, पो.अं. ३५११ केशव हिरवे, पो.अं. १६९५ प्रशांत खाडे, पो.अं. १५९२ रियाज पटेल, पो.अं.१००७५ राहुल रासगे पो.अं ४५०७ राहुल शेलार, पो.अं १३४९ रशिद शेख पो.अं. ७३३ शाहिद रजपुत, पो.अं.८१२६ ओंकार शेटे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!