Homeक्राईमबाणेरमध्ये क्रेन बॅटरी चोरीचा पर्दाफाश; ५ तासांत ३ आरोपी अटकेत, ५.६० लाखांचा...

बाणेरमध्ये क्रेन बॅटरी चोरीचा पर्दाफाश; ५ तासांत ३ आरोपी अटकेत, ५.६० लाखांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बाणेर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

बाणेर पोलीस ठाणेकडील गु.र.नं.१२२/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल असुन दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांची दि.२१/०४/२०२६ रोजी पहाटे ०४/०० वा.ते दि.२८/०४/२०२६ रोजी सकाळी ०९/३० वा.चे दरम्यान फिर्यादी यांच्या दोन क्रेन ह्या विजय सेल्स बाणेर रोड पेट्रोल पंपाचे जवळ पुणे येथे सुरक्षित लॉक करुन पार्क करून ठेवल्या होत्या, त्यांच्या मधील टॉरझन कंपनीच्या काळ्या रंगाच्या ४८ व्होल्ट क्षमतेच्या एकुण १६ बॅट-या प्रत्येक बॅटरीची कि अं. ३५,०००/-रु. असा एकुण ५,६०,००० (पाच लाख साठ हजार रुपयाचा माल) कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादींचे संमतीशिवाय लबाडीने चोरीच्या उद्देशाने चोरुन नेल्या आहेत. अशी तक्रार दिल्याने वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा करणारा अज्ञात आरोपी यांचा बाणेर पोलीस स्टेशनकडील तपास पथक शोध घेत असताना आरोपीस शोधण्या इतपत कोणताही ठोस पुरावा नसतांना बाणेर पोलीस स्टेशन कडील तपास पथक पोलीस अधिकारी अंमलदार यांनी अत्यंत कसोशिने घटनास्थळावर मिळुन आलेले सीसीटीव्ही आणि त्याच्या व्यतिरीक्त तपासाचे अनुषंगाने विविध १२५ सीसीटीव्ही फुटेज चेक करीत असताना पोलीस अंमलदार बाबा आहेर, किसन शिंगे व अतुल इंगळे यांना सीसीटीव्ही फुटेजमधील संशयीत इसम है इंदिरा वसाहत औंध पुणे येथील असल्याचे निष्पन्न झाले. तसेच बातमीदारांमार्फत निष्पन्न गुन्हा करणारे आरोपी यांचा सध्याचा ठावठिकाणा याचा शोध घेवून दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे १) सुनिल नवनाथ लोखंडे वय ३० वर्षे रा. आंबेडकरचौक, इंदिरा वसाहत औंध पुणे २) साहिल अशोक माने वय २१ वर्षे रा. हनुमान मंदिरामागे इंदिरा वसाहत औंध पुणे ३) अक्षय शहाजी बोराडे वय २८ वर्षे रा. साईबाबा मंदिराजवळ इंदिरा वसाहत औंध पुणे यांना अटक करुन त्यांचेकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता नमुद आरोपीतांनी सदर गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे. नमुद गुन्ह्यातील अटक आरोपींकडुन गुन्ह्यातील चोरीस गेले मालापैकी चोरीस गेलेल्या बॅट-या ह्या आरोपीतांकडुन जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच आरोपी नामे साहील माने, अक्षय बोराडे यांचेकडून चोरीच्या बॅट-या विकून प्राप्त केलेले नगदी सोळा हजार रुपये सुध्दा जप्त करण्यात आले आहेत. पुढिल तपास सहा पोलीस निरीक्षक के बी डाबेराव हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर श्री. चुलूमुला रजनिकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर श्री. विठ्ठल दबडे, यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग, सपोनि के बी डाबेराव, गणेश रायकर, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, खरात, गजानन अवातिरक, शरद राऊत, स्वप्नील मराठे, गणेश भोईने, समीर पवार सर्व नेमणुक बाणेर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!