Homeक्राईमस्वारगेट येथील धायरी पी.एम.टी. स्टॉप येथे महिलेच्या हातातील सोन्याचे बांगडी चोरी करणाऱ्या...

स्वारगेट येथील धायरी पी.एम.टी. स्टॉप येथे महिलेच्या हातातील सोन्याचे बांगडी चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद .

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर !

स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं २५८ / २०२५ भारतीय न्यायं संहिता कलम ३०३ (२) मधील फिर्यादी ह्या दिनांक २९/०९/२०२५ रोजी सायंकाळी ०५/०७ ते ०५/३० वाजताचे सुमारास स्वारगेट येथील धायरी फाटा बस स्टॅण्ड येथे स्वारगेट ते नऱ्हेगांव बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने स्वतःच्या फायदयाकरीता लबाडीच्या इरादयाने गर्दीचा फायदा घेवून फिर्यादीच्या हातातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी कट करुन चोरी केली होती म्हणून फिर्यादी यांनी अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दिल्याने वर नमुद गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेकामी श्री. यशवंत निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना देवुन गुन्हा उघडकीस आणणेकामी आदेशित केले होते.

त्यावरुन तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील व पोउपनिरी रविंद्र कस्पटे यांनी तपास पथकातील सुजय पवार व हर्षल शिंदे यांना धायरी पीएमटी स्टॉप जवळील सीसीटिव्ही फुटेज पाहणेबाबत आदेश दिले. त्यावरुन सुजय पवार व हर्षल शिंदे यांनी सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली त्यावरुन एक इसम संशयास्पद दिसुन आला. सदर संशयित इसमाचे व्यवस्थित फुटेज मिळणेकामी हर्षल शिंदे व सुजय पवार यांनी स्वारगेट, हडपसर, मांजरी, येरवडा, केशवनगर, मुंढवा याठिकाणांवरील जवळ जवळ १०० ते १५० सीसीटिव्ही फुटेज पाहुन सदर आरोपीचा व्यवस्थितीत वर्णनाचा फोटो प्राप्त केला.

तद्नंतर बातमीदारांना सदर फोटो मधील इसमाचा शोध घेणेकामी सांगितले असता दि. ०७/१०/२०२५ रोजी सुजय पवार व हर्षल शिंदे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील संशयित इसम हा मुंढवा परिसरामध्ये राहण्यास आहे. अशी बातमी मिळाल्याने लागलीच मा. वरिष्ठांचे परवानगीने स्टाफसह जावुन सर्वोदय कॉलनी मुंढवा येथे जावुन बातमीप्रमाणे इसमाचा शोध घेतला असता इसम नामे राज कृष्णा माने वय २३ वर्षे रा. सर्वोदय कॉलनी मुंढवा पुणे हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. सदर आरोपीकडुन तपासा दरम्यान दाखल गुन्ह्यातील एकुण २,५०,०००/- रुपये किंमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याचे बांगडी जप्त करुन दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी ही मा. श्री. राजेश बनसोडे साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. मिलींद मोहिते साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – २, पुणे शहर, मा. राहुल आवारे साो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. यशवंत निकम, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. विकास भारमळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे), स्वारंगेट पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या आदेशान्वये तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पो.हवा, अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, पोलीस अंमलदार सुजय पवार, दिपक खेंदाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संदीप घुले, संग्राम केंद्रे, प्रशांत टोणपे, हनुमंत दुधे, सागर काळे यांनी एकत्र मिळुन केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!