Homeक्राईमविमानतळ पोलिसांची मोठी कामगिरी घरफोडी करुन चोरी करणा-या सराईतांकडुन १४ लाख रुपये...

विमानतळ पोलिसांची मोठी कामगिरी घरफोडी करुन चोरी करणा-या सराईतांकडुन १४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर ४६५ / २०२५ भारतीय न्याय संहीता कायदा कलम ३०५, ३३१(३), ३३१ (४) प्रमाणे दिनांक २३/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. यातील फिर्यादी नामे अंजली कानीकराज सिगामनी, वय ३४ वर्षे रा. वडगाव शिंदे रोड लोहगाव पुणे यांचे राहते घराच्या दरवाजाचे कुलूप कोणीतरी अज्ञात इसमाने तोडुन आतमध्ये प्रवेश करुन घरामधील ९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व दोन लॅपटॉप असा मुद्देमाल चोरी केला होता. सदर बाबत वपोनि गोविंद जाधव यांचे आदेशान्वये तपास पथक अधिकारी व कर्मचारी यांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरु केला होता. त्याप्रमाणे पोलीस शिपाई योगेश थोपटे व ज्ञानदेव आवारी यांनी घटनास्थळा वरील व आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती. त्यामध्ये तीन संशयित इसम दिसत होते. त्याप्रमाणे लोहगाव, पोरवाल रोड, डीवाय पाटील कॉलेज रोड, पोरवाल रोड, जिलेबी चौक, डीवाय पाटील चौक, प्राईड वर्ल्ड सिटी, पठारे चौक च-होली, पठारे मळा, दिघी, भोसरी या भागातील तब्बल १४४ सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेजची तपासणी करुन यातील दोन आरोपींना निष्पन्न केले. व त्याप्रमाणे आरोपी नामे १) जय संजय मोहिते, वय २२ वर्षे रा. नेताजी खोंडे यांचे घरी भाड्याने, कॉलनी नं. ४, महादेव नगर, साईकृपा बिल्डींग शेजारी, भोसरी पुणे २) आकाश सुधीर साळवी वय २३ वर्ष रा. स.नं. ०२, गायकवाड नगर, भगिनी निवेदिता हॉस्टेल शेजारी, प्रेमसुंदर निवास दिघी पुणे यांना शिताफिने सापळा लावुन पकडण्यात आले होते. व त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली होते. नमुद आरोपी यांचेकडील तपासामध्ये आरोपी नामे शुभम अशोक मडीवाळ वय २० वर्षे याचे नाव निष्पन्न झाल्याने, त्याप्रमाणे पोलीस हवालदार सचिन मांजरे व लालु क-हे यांना मिळालेल्या गोपनीय बातमी वरुन आरोपी नामे शुभम अशोक मडीवाळ वय २० वर्षे रा. आकाशवाणी, टेकावडे पेट्रोल पंपाशेजारी, गोंधळेनगर, हडपसर पुणे यास दिनांक ०६/१०/२०२५ रोजी अटक करण्यात आली होती. तपासा दरम्यान नमुद आरोपी यांचेकडुन ११ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे, तीन लाख रुपये किंमतीचे दोन लॅपटॉप जप्त करण्यात आलेले आहेत. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक मनोज बरुरे हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. श्री अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त परि ०४, श्रीमती प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मनोज बरुरे, पोलीस कर्मचारी योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, लालु क-हे, सचिन मांजरे, रुपेश पिसाळ, दादासाहेब बर्डे, हरीप्रसाद पुंडे, शैलेश नाईक, अंकुश जोगदंडे, राकेश चांदेकर, गणेश इथापे, सागर कासार, पांडुरंग म्हस्के, मपोशि सना शेख यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!