संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर !
* सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर *
दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार विकास बांदल, संदीप कांबळे, तानाजी सागर व सागर शेडगे असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार तानाजी सागर, व संदिप कांबळे यांना त्याचे खास बातमीदारामर्फत बातमी मिळाली की, एक इसम त्याने अंगात निळ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट व डोक्याचे केस वाढलेले असुन तो धोंडीबा निवास बिल्डींगच्या खाली वडगाव पुणे येथे पांढ-या रंगाचे पिशवीमध्ये एक लोखंडी हत्यार घेवुन थांबलेला आहे. सदरची बातमी त्यांनी तात्काळ तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर यांना कळविली असता, त्यांनी ती मा. वरिष्ठांना कळविल्याने सदर बातमीची खात्री करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. पोलीस स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन पाहणीकरता एक इसम हा बिल्डींगच्या खाली पार्किंगमध्ये थांबलेला दिसला त्याने पोलीसांना पाहून पळुन जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यास वरील स्टाफच्या मदतीने पकडून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव संकेत बालाजी गायकवाड वय २७ वर्षे रा. पीएमसी शाळेमागे गोसावी वस्ती वडगाव बु पुणे असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ ८००/- रु. किं.चा एक लोखंडी कोयता मिळुन आला. तसेच त्याचे घरझडती मध्ये एक लोखंडी धारदार हत्यार व एक लोखंडी तलवार मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले असुन त्याचे विरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१५४ /२०२६ आर्म अॅक्ट क.४ (२५) म.पो.अधि.क.३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार विकास बांदल हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३. पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे शहर श्री. अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. समीर गायकवाड यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, सतिष मोरे, राहुल ओलेकर, सागर शेडगे, तानाजी सागर, संदिप कांबळे, समीर माळवदकर, विनायक मोहीते व शिरीष गावडे यांचे पथकाने केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























