संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर !
फिर्यादी यांची पत्नी नामे पुनम दिनेश मुन हीचे अॅड. संजय सावंत यांचेशी प्रेमसंबंध असल्याचे संशयावरुन अॅड. सावंत यांची पत्नी स्वाती संजय सावंत, त्यांची मुलगी व अॅड. संजय दत्तात्रय सावंत यांनी आपआपसात संगनमत करुन, कट रचुन दिनांक १६/०४/२०२६ रोजी दुपारी १४/०० ते दिनांक १७/०४/२०२६ रोजी सकाळी ११/०० वा. दरम्यान अॅड. संजय सावंत यांचे ऑफीस जुना मुंढवा रोड, संदीप हॉटेल जवळ, चंदननगर, पुणे येथे पुनम मुन हिचे स्वाती सावंत व तिची मुलगी यांनी दोरीने पाय बांधुन, तिचे डोक्यात, तोंडावर बॅटने व कोणत्यातरी धारदार शस्त्राने मारुन तिचा खुन केला आहे, म्हणुन तक्रार दिल्याने चंदननगर पोलीस स्टेशन गु.रजि.नं.१६१/२०२६, भा.न्या.सं.क. १०३ (१), ६१ (२),३ (५) सह अनुसुचित जाती व अनूसुचित जमाती अत्याचारास प्रतिबंधक (सुधारणा) अधिनियम २०१५ चे कलम ३ (२) (va) अन्वये गुन्हा दाखल करणेत आला होता.
दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने चंदननगर पोलीस स्टेशन कडील अधिकारी यांनी तांत्रिक दृष्ट्या तपास करुन दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे अॅड संजय सावंत वय ४३ वर्षे रा. आनंदपार्क, वडगावशेरी, पुणे व त्याची मुलगी यांना ताब्यात घेतले आहे. तसेच गुन्ह्यातील महिला आरोपी स्वाती संजय सावंत वय ४३ वर्षे रा. आनंदपार्क, वडगाव शेरी, पुणे हिचा सदर गुन्ह्यातील तिची भुमिका निषन्न करुन बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करुन तीस सदर गुन्ह्याचे तपाकामी गुन्हे शाखा, खंडणी विभाग-२, पुणे शहर यांनी ताब्यात घेतले आहे. यातील आरोपी यांचेकडे गुन्ह्याबाबत कसुन तपास करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेने खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी यांना ०६ तासाचे आत जेरबंद करण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहा पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग अतिकार्या खराडी विभाग, पुणे श्रीमती नुतन पवार ह्या करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ७, पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग, पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे, मा. सहा पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग, श्रीमती नुतन पवार, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा-२, पुणे शहर श्री राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निलेश बडाख, चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर व चंदननगर पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विभाग-२, गुन्हे शाखा, श्री. राम राजमाने, व त्यांचेकडील पोलीस अंमलदार अमोल घावटे, कुसाळकर, गणेश खरात, सुरेद्र जगदाळे, दिलीप गोरे, प्रशांत शिंदे, प्रविण भोसले, कानीफनाथ कारखेले यांनी केली.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























