Homeक्राईमवर्षांपासून फरार खून प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर खराडी पोलिसांच्या जाळ्यात.

वर्षांपासून फरार खून प्रकरणातील मुख्य आरोपी अखेर खराडी पोलिसांच्या जाळ्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर !

चंदननगर पोलीस स्टेशन पुणे गुन्हा रजि. नं. १८८/२०१९ भादवि कलम ३९५,३९६.३६४,३४२,३२३.५०६, २०१ आर्म अॅक्ट कलम ४, २५ अन्वये दाखल आहे. दाखल गुन्हयात एकुण ०८ आरोपी असुन यातील आरोपींनी फिर्यादीचे दोन मोबाईल, गळ्यातील सोन्याची चैन, हातातील ब्रासलेट, घडयाळ व चारचाकी क्विड गाडी असा एकुण ३,६५,०००/- रु किंमतीचा मुददेमाल जबरदस्तीने फिर्यादीच्या ताब्यातुन घेतल्याने फिर्यादी यांनी दिले तक्रारी वरून वरील प्रमाणे गुन्हा नोंद असून, दाखल गुन्हयाचे तपासामध्ये फिर्यादी यांचे सोबतच आरोपी यांनी फिर्यादी यांचे सोबत असलेला मित्र नामे राहुल शिवाजी शेलार, वय-२४ वर्षे, रा-दातेवाडी, ता-खटाव, जि-सातारा यास फिर्यादी यांचे बरोबर कॉर्नेट लॉज खराडी पुणे येथुन बाहेर नेले व त्याचा खुन करुन त्याचा मृतदेह नदीच्या पाण्यात फेकुन दिला म्हणून सदर गुन्हयात भादवि कलम ३९६, २०१ अन्वये कलम वाढ करण्यात आली.

सदर गुन्हयाच्या तपासात चंदननगर पोलीसांनी एकुण ०७ आरोपींना अटक केली असुन सदरचा गुन्हा हा सध्या न्यायप्रविष्ट आहे. परंतु सदर गुन्हयातील पाहिजे असलेला मुख्य आरोपी तेजस अमृत ढेरे हा गुन्हा दाखल झाल्यापासुन परांगदा झाल्याने तो अदयाप पावेतो फरार होता. त्याचेविरुद्ध पुढील प्रमाणे गुन्हे दाखल असुन तो अतिशय निर्वावलेला व कुख्यात गुन्हेगार आहे.

दिनांक २५/०४/२०२६ रोजी पहाटे ०३/०० वा चे सुमारास खराडी पोलीस स्टेशनच्या रात्रपाळी तपास पथकातील पोलीस अंमलदार पोहवा/५५ दत्त्ताञय खरपुडे, पोशि/२१५७ अशोक केदार हे पोलीस ठाणे हददीत गस्त करीत असताना त्यांना खबर प्राप्त झाली की, वर नमुद गुन्हयातील पाहीजे फरार आरोपी तेजस अमृत ढेरे हा खराडी परिसरात येणार आहे. सदरची माहिती प्राप्त होताच त्यांनी सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन श्री संजय चव्हाण यांना दिली असता त्यांनी नमुद पाहीजे आरोपी यास तात्काळ ताब्यात घेवुन पुढील कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार रात्रपाळी अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री संतोष म्हेजे व पोलीस हवालदार/५५ दत्ताञय खरपुडे, पोशि/२१५७ अशोक केदार यांनी प्राप्त खबरीच्या अनुषंगाने प्यासा हॉटेलच्या पाठीमागे, उबाळे नगर, खराडी, पुणे येथे पहाटे सुमारास सापळा रचुन आरोपी तेजस अमृत ढेरे यास त्याचेकडील वाहनासह ताब्यात घेतले आले व त्याचेकडे नमुद गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देउन असमाधानकारक माहिती दिल्याने त्यास वाहनासह ताब्यात घेवुन त्यास पोलीस ठाण्यास आणुन तपास पथकाचे अधिकारी सपोनि रविंद्र गोडसे व वरील पथक यांनी चौकशी केली असता त्याने त्याचे नाव तेजस अमृत ढेरे, वय ३६ वर्षे धंदा नाही रा. अलका उत्तम बिल्डींग, दत्त्त चौक, मुंढवा रोड, पुणे असे सांगितले व त्याने गुन्हा दाखल झाल्यापासुन ०६ वर्षापासुन परागंदा झाल्याची कबुली दिलेली आहे. नमुदवेळी आरोपी तेजस ढेरे याचेकडे मिळुन आलेली हुंडाई कंपनीची मोटार सॅन्ट्रो क्रमांक एमएच-०५/एबी-२६०४ ही जप्त करण्यात आली आहे व नमुद आरोपीस पुढील कारवाई करीता चंदन नगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी मा. श्री अमितेशकुमार सो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. मनोजकुमार पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्री. सोमय मुंडे, पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ ७. पुणे शहर, मा. श्रीमती पुनम पवार मॅडम, सहा. पोलीस आयुक्त सो, खराडी विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संजय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस ठाणे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक श्री राहुल कोळपे, पोलीस अंमलदार दत्तात्रय खरपुडे, अशोक केदार, महेश नाणेकर, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, विलास केदारी, साहेबराव गुंडाळे सर्व नेमणुक खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!