Homeक्राईमरामटेकडी येथे ज्येष्ठ नागरिकाला लुटणारा आरोपी वानवडी पोलिसांकडून जेरबंद; १५ ग्रॅम सोन्याची...

रामटेकडी येथे ज्येष्ठ नागरिकाला लुटणारा आरोपी वानवडी पोलिसांकडून जेरबंद; १५ ग्रॅम सोन्याची चैन जप्त.

संपादक फिरोज खातीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि.१२/१२/२०२५ रोजी मधुबन सोसायटीकडुन हिलसाईड अपार्टमेंटकडे जाणारे रोडवर टेकडीचे जवळ रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया रामटेकडी हडपसर पुणे येथे चार अनोळखी आरोपीतांनी एका वयोवृध्द इसमाला टेकडीजवळील निर्जन रस्त्यावर चालत जात असताना अडवुन त्यांना हाताने मारहाण करुन त्यांचे गळयातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन ही जबरदस्तीने ओढुन घेवुन एका मोटारसायकलवरुन तेथुन निघुन गेले होते त्यावरुन वयोवृध्द इसमाने दिलेल्या फिर्यादीवरुन वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ५०६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.

वानवडी पोलीस ठाणेकडील तपासपथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वरिष्ठांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली दाखल गुन्हयाचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज चेक करुन, त्यामधील संशयीत इसमांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान दि. १८/१२/२०२५ राजी तपास पथकातील पोलीस अंमलदार विष्णु सुतार,विठ्ठल चोरमले व अभि चव्हाण यांना त्यांचे खास बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, दि.१२/१२/२०२५ रोजी हिलसाईड अपार्टमेंटकडे जाणारे रोडवर टेकडीचे जवळ रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया रामटेकडी हडपसर पुणे येथे एका वृध्द इसमाला अडवुन हाताने मारहाण करुन त्यांचे गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावुन चोरी करुन घेवुन जाणारे चार इसमांपैकी एक इसम हा सध्या गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील ओढ्यावरील छोट्या पुलावर निर्जन ठिकाणी त्याचेकडील अॅक्टीवा गाडीवर कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे.” अशी बातमी मिळाल्याने वानवडी पोलीस ठाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व स्टाफ असे दोन पंचांसह बातमीचे ठिकाणी जावुन संशयीत इसमास शिताफीने पकडुन त्याचा नाव पत्ता विचारला असता त्यांने त्याचे नाव उमर नुर खान वय १८ वर्षे रा.नवाधिश पार्क कोंढवा पुणे असे असल्याचे सांगितले त्याचे अंगझडतीमध्ये त्याचे पॅन्टचे खिशात अंदाजे १५ ग्रॅम वजनाची सोन्यासारखी दिसणारी पिवळया धातुची चैन मिळुन आली. सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेने त्याचेकडे असणारी नमुद चैन व मोटारसायकल ही गुन्हयाचे कामी जप्त करुन ताब्यात घेतली असुन नमुद आरोपीतास दाखल गुन्हयात अटक केले आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा.सहा.पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर श्रीमती नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. भाऊसाहेब पाटील, वानवडी पो. स्टे. पुणे शहर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता जाधव, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व पोलीस अंमलदार अतुल गायकवाड, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, विष्णू सुतार, विठ्ठल चोरमले, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, आशिष कांबळे, बालाजी वाघमारे अर्शद सय्यद व महिला पोलीस अंमलदार रुपाली खेडकर, शैला ठेंगल या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!