संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! अलंकार पोलीस स्टेशन, पुणे शहर !
अलंकार पोलीस स्टेशन हद्दीत दि. १४/०३/२०२६ रोजी रात्रौ १०.०० ते दि.१५/०३/२०२६ रोजी १७.०० वा. चे दरम्यान फिर्यादी यांचे द टेरीटरी ४३/६८, नवसह्याद्री सोसायटी, कर्वे नगर, पुणे याठिकाणी असलेल्या ऑफीसचे अज्ञात इसमाने खिडकीचा बार तोडुन ऑफीसमध्ये प्रवेश करुन एक सोनी कंपनीचा कॅमेरा, दोन लेन्स, एक Mavic Pro 2 Drone, अॅपल कंपनीचा आयफोन व इतर इलेक्ट्रोनिक्स वस्तु एकुण ६,७१,५००/- रु. की. च्या चोरुन नेलेबाबत गु.र.नं. ४३/२०२५ भा. न्या. सं. कलम ३३१ (४),३०५ (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. तपासा दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक इसम रॉयल इन्फिल्ड कंपनीची हिमालय मॉडेल असलेली बुलेट घटनास्थळा जवळून चालवत घेवुन जाताना दिसला. तांत्रिक विश्लेषणामध्ये तसेच सीसीटीव्ही मध्ये आरोपी चालवत असलेल्या रॉयल इन्फिल्ड बुलेट गाडीचा शोध घेतला असता आरोपी हा हैद्राबाद, चंद्रपुर, नागपुर, जबलपुर, लालबर्रा, शाडोल (मध्य प्रदेश), मिर्झापुर यामार्गे जात असलेबाबत आढळुन आलेने वाराणसी पोलीस आयुक्तालय उत्तर प्रदेश पोलीसांच्या मदतीने आरोपीस सापळा रचुन ताब्यात घेतले. आरोपीस त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव मोहम्मद बशर नुर मोहम्मद, वय ३८ वर्षे, रा. १३९०,साऊथ डोनिया, काडोमटोली, डोनिया १२३६, ढाका. बांग्लादेश उर्फ नेवानाथ विनोद कुमार रा. सी. ९०, व्यंकटपुर बालाजी नगर, रंगारेड्डी, तेलंगाना वाराणसी उत्तर प्रदेश असल्याचे सांगितले. दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने आरोपीकडे तपास केला असता आरोपी हा वेगवेगळे नाव वापरुन फेक (खोटे) ओळखपत्र बनवुन गुन्हा करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ अलंकार पोलीस स्टेशन कडील गुन्हयात चोरी केलेला मुद्देमाल एक सोनी कंपनीचा कॅमेरा, लेन्स, एक Mavic Pro 2 Drone, अॅपल कंपनीचा आयफोन व इतर इलेक्ट्रोनिक्स वस्तु असा एकूण ६,००,०००/- रु की. चा मुद्देमाल मिळून आला.
तसेच आरोपीजवळ बांग्लादेशी पासपोर्ट, अमेरिकी डॉलर, चायनिज मुद्रा, मलेशियन सिंगापुर कॅनडियन नेपाळ यांची करन्सी मिळुन आल्याने आरोपी विरुध्द रामनगर पोलीस स्टेशन, वाराणसी पोलीस आयुक्तालय उत्तर प्रदेश ७४/२०२६ भा.न्या.सं.क ३१७(२), ३१९ (२), ३३८, ३३६ (३), ३४० (२) व द इमिग्रेशन अँड फॉरेनर अॅक्ट कलम २१, २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर आरोपी विरुध्द आंध्र प्रदेश, तेलंगाणा राज्यामध्ये एकुण ३६ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री राजेश बनसोडे मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३, पुणे शहर, श्री संभाजी कदम मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग पुणे शहर श्रीमती सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकार पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक गणेश दिक्षित, महेश निंबाळकर, जगन्नाथ भोसले, पोलीस अंमलदार जगदीश तळोले, निशीकांत सावंत, धिरज पवार, चांदगुडे, सोमेश्वर यादव, महिला पोलीस अंमलदार कुंभार यांनी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























