संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
सायबर पोलीस स्टेशन गु.र.क्र २९/२०२५ मधील फिर्यादी या राहते घरी महाळुंगे, पुणे येथे असताना त्यांना त्यांचे व्हॉट्सअप नंबरवर अनोळखी मोबाईल नंबरवरून Credit Pilot या नावाने लोनॲपची एक लिंक आली होती. फिर्यादीने ती लिंक ओपन केली असता, लिंकद्वारे फिर्यादीचे मोबाईलचा संपूर्ण एक्सेस अनोळखी आरोपीने घेवून परस्पर फिर्यादीचे नावाने लोन काढण्यात आले व सदर लोनचे पैसे भरण्यासाठी फिर्यादी यांना वांरवार वेगवेगळया मोबाईल क्र. +९२३०८१६६३२८८,
+९२३११५२३२०१२, +९२३२७६५०१६१७,
+९२३१४५२५३८३७, +९२३१६५४५१७६६,
+९२३३२३७६०४५७,
+९२३१८७३६२९७२, +९२३१९०४१०४११, +९२३४१०२५८१८९, +९२३४४७०१७१२६,
+९२३२९७४१५२७०, +९२३७०५५३०३८७, +९२३७०१३७०६५८ + ९२३१८७३६२९७२, +९२३१८७३६२९७२ यावरून फोन करून १) Abu Siddik 8822721232@airtel, २) RAKESH KUMAR SAHU PhonePe . 8260630965-5@axl व ३) MrRitik Singh Google Pay. Sureshsingh00998877-5@okaxis यावर अॅपवर ऑनलाईन पैसे भरण्यास भाग पाडून फिर्यादी कडून एकुण ९,०००/- रुपये प्राप्त केले. सदरची रक्कम भरल्यानंतरही पुन्हा १५,०००/- रुपये भरण्यास सांगुन अवास्तव लोनची रक्कम भरण्यास सांगुन ती न भरल्यास फिर्यादीचे मोबाईल नंबर मध्ये सेव असलेल्या मोबाईल नंबरवरती फिर्यादीचे मॉर्फ केलेले न्युड फोटो पाठविण्याची धमकी दिली, त्यास फिर्यादीने नकार दिल्याने त्यांनी फिर्यादीचे नातेवाईकांचे व्हॉट्सअपवर न्युड फोटो पाठविले म्हणुन फिर्यादीने Credit Pilot या लोन ऍप्लीकेशन विरोधात व लिंक आलेला +९२ ने सुरुवात होणारा व्हॉट्सअॅप नंबर व वर नमुद सर्व व्हॉट्सअपधारक व युपीआय आयडी धारकांचे विरोधात कायदेशीर तक्रार दिल्याने सायबर पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड गु.र.नं २९ / बी. एन. एस २०२३ चे कलम ३०८, ३१६(२), ३१८(४), ३(५) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (डी), ६७(ए) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मा. शिवाजी पवार, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे पिंपरी चिंचवड यांनी दाखल तक्रारीचे गार्भीय ओळखून तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्याचे आदेशित केले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी सपोनि प्रविण स्वामी, पोउपनिरीक्षक सागर पोमन व पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे यांचे पथक तयार करण्यात आले होते. सपोनि प्रविण स्वामी यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाव्दारे दाखल गुन्हयातील Credit Pilot या लोन ऍप्लीकेशनचे IP Logs ची माहिती घेतली असता, सदर अॅप्लीकेशन हे मुंबई येथून डेव्हलप केल्याचे दिसून आले. सदर अॅप बाबत तांत्रीक विश्लेषण केले असता, संशयीत आरोपीचे लोकेशन मुबंई येथे मिळाले. आरोपीचे शोध घेणेकामी वरीष्ठांची परवानगी घेऊन पोउपनि वैभव पाटील व तपास पथक यांना पाठविले, त्यांनी नंबरचे लोकेशनवरून नंबर धारकास ताब्यात घेतले असता, सदर इसम नामे इसाकी राजन थेवर हा वापरत असल्याचे निष्पण झाले. सदर आरोपीचे ताब्यात १ मोबाईल, ५ लॅपटॉप, ७ सिमकार्ड व २ डेबीट कार्ड मिळून आलेले आहेत. लपटॉपची पाहणी केली असता अनेक फ्रॉड अॅप 1 ) Creditkeeper 2) Inlonecredit 3) New-lone 4) ligallone 5) Fastcash 6) Handycash 7 ) Insta- lone या लोन अॅपवरून लोकांची फसवणूक केल्याचे दिसून आले. सदर अॅपवरून भारतभरात १० हजारापेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झाल्याचे दिसून आले. तसेच सदरील आरोपी हा सिंगापूर येथील चायनीज व्यक्तीचे सांगणावरून हे अॅप तयार करून देत असल्याचे निष्पण झालेले आहे.
दाखल गुन्हयात आरोपी नामे इसाकी राजन थेवर वय २९ वर्षे रा वाशी ठाणे मुळ रा तमिळनाडु याचा गुन्हयात सहभाग असल्याने त्याला गुन्हयात अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा अधिक तपास पो.नि रविकिरण नाळे, सायबर पोलीस ठाणे, हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. शशीकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, मा. सारंग आव्हाड अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. शिवाजी पवार पोलीस उप आयुक्त गुन्हे, मा. डॉ. विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि प्रविण स्वामी, पोउपनि सागर पोमन, पोउपनि वैभव पाटील, पोउपनि प्रकाश कातकाडे, पोलीस उपनिरीक्षक विदया पाटील, पोलीस अंमलदार, अतुल लोखंडे, दिपक भोसले, हेमंत खरात, सुभाष पाटील, सचिन घाडगे, कृष्णा गवळी, श्रीकांत कबुले, नितेश बिच्चेवार, सोपान बोधवड, माधव आरोटे, स्वप्निल खणसे, वैशाली बर्गे, शुभांगी ढोबळे, दिपाली चव्हाण,भावीका प्रधान सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























