Homeक्राईमएकतर्फी प्रेमातून प्रियकराने प्रियसीचे पतीवर कोयत्याने वार करून केला खुन, दोघांना घेतले...

एकतर्फी प्रेमातून प्रियकराने प्रियसीचे पतीवर कोयत्याने वार करून केला खुन, दोघांना घेतले ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखा, व जेजूरी पो स्टे, पुणे ग्रामीण पोलीसांची कामागिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४०७ / २०२५ भा. न्या. सं. क १०३ (१) प्रमाणे दि. १४/१२/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे. दि. १४/१२/२०२५ रोजी सकाळी ११/१५ वा दरम्यान जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील माळशिरस गावचे हद्दीत रामकाटी शेताचे शिवारात मयत नामे दिपक गोरख जगताप वय २२ वर्षे रा. माळशिरस ता पुरंदर जि पुणे याचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावर धारदार हत्याराने वार केलेले होते. मयताचे पत्नीवर एकतर्फी प्रेम करणारा इसम नामे सुशांत संदीप मापारे रा. माळशिरस ता. पुरंदर जि पुणे याने खून केला असल्याची फिर्याद मयताचे मामा संतोष रोहीदास शेंडकर वय ४६ वर्षे रा. चांबळी ता पुरंदर जि पुणे यांनी नोंदवली आहे.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा होता, मा. पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व जेजूरी पोलीस स्टेशन कडील पथकांनी एकत्रित सुरू केला. सदर गुन्हयातील आरोपी सुशांत मापारे याचा पथकांनी शोध घेत असताना तो राहते गावातून परागंदा झाला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीचे आधारे माहिती प्राप्त झाली की, सदरचा आरोपी हा बाहेरील जिल्हयात पळून जाणार असून तो यवत परिसरात असल्याचे समजले. त्या अनुषंगाने पथकांनी यवत परिसरात सापळा रचून आरोपी सुशांत संदिप मापारे वय २१ वर्षे व्यवसाय चालक, रा. माळशिरस, ता. पुरंदर जि. पुणे मुळ रा. पिंपळगाव ता. दौंड जि. पुणे यास ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले असून त्याचे सोबत गुन्हा करतेवेळी विधीसंघर्षित बालक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. विधीसंघर्षित बालकास सुद्धा रखवालीत घेण्यात आले आहे. आरोपींनी गुन्हयात वापरलेला कोयता जप्त करणेत आला आहे. आरोपी सुशांत मापारे यास मा. न्यायालयात हजर केले असता त्याची दि. २२/१२/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करणेत आलेली असून विधीसंघर्षित बालकाची सुधारगृहात रवानगी करणेत आलेली आहे. आरोपी सुशांत मापारे याचे मयताचे पत्नीवर एकतर्फी प्रेम होते, तिचेसोबत लग्न करण्याची इच्छा होती, परंतु मयताने तिचे सोबत लग्न केल्याने त्याचा राग मनात धरून आरोपी सुशांत मापारे याने मयत दिपक जगताप यास दारू पिण्याचे निमित्ताने बोलावून घेवून साथीदार विधीसंघर्षित बालकाचे मदतीने त्याचेवर कोयत्याने वार करून खून केला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

आरोपी सुशांत संदिप मापारे याचेवर यापुर्वी विनयभंग व शरिराविरूद्धचा असे दोन गुन्हे दाखल असून त्याचेवर प्रतिवर्धक कारवाई देखील करणेत आलेली आहे.

सदरची कार्मागरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्रसिंह गौर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, जेजुरी पो स्टे चे स.पो.नि. दिपक वाकचौरे, स्था. गु.शा.चे, पोसई अमित सिदपाटील, जेजूरी पो स्टे चे पोसई महेश पाटील, पोसई नामदेव तारडे, पोसई सर्जेराव पुजारी, अंमलदार पोहवा आण्णासाहेब देशमुख, जाधव, तात्यासाहेब खाडे, दशरथ बनसोडे, बिटल कदम, संदिप भापकर, हेमंत भोंगळे, कुंभार, कोळेकर, मपोकॉ कसेकर, स्था.गु.शा.चे अंमलदार सचिन घाडगे, अमोल शेडगे, मंगेश भगत, धिरज जाधव, राजू मोमीण, यांनी केली असून पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशन करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!