मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610
सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे शहर !
मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणा-या चोरटयाकडुन तीन मोटारसायकल केल्या जप्त.
दिनांक २०/०६/२०२६ रोजी आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधात्मक अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सचिन गाडे व प्रमोद भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत माहीती मिळाली की, आंबेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं २८४/२०२५ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) या गुन्हयातील चोरीस गेलेली मोटारसायकल ही इसम नामे अजय मर्याप्पा जावीर याने चोरी केली असुन तो सदरची मोटारसायकल सह जांभुळवाडी तलाव जवळ बसलेला आहे. सदरवेळी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक युवराज शिंदे व पोलीस अंमलदार असे प्राप्त बातमीच्या ठिकाणी गेले असता तलावाजवळ मोकळया जागेत एक इसम संशयितरीत्या मोटारसायकलवर बसलेला दिसला. त्यावेळी त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अजय मर्याप्पा जावीर वय २९ वर्षे, रा. दुर्गामाता मंदिराचे मागे, हनुमाननगर, शनिनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खु पुणे असे सांगितले. त्यानंतर सदर इसमांकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे ताब्यातील मोटारसायकल ही दि.१४/०६/२०२६ रोजी हरिओम हार्डवेअर समोरुन, जांभुळवाडी रोड, शनिनगर चौक येथुन चोरली असल्याचे सांगितले. सदर आरोपीकडुन नमुद गुन्हयातील मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच त्याचेकडे अधिक कसुन चौकशी केली असता त्याने भारती विद्यापीठ, पुणे स्टेशन परीसरातुन मोटारसायकल चोरी केल्या असल्याचे सांगितले असुन त्याचे ताब्यातुन एकुण तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर श्री. मिलींद मोहिते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चांगदेव सजगणे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक युवराज शिंदे, पोलीस अंमलदार वेतन गोरे, हणुमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे, शिवाजी पोटोळे व फिरोज शेख यांनी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























