संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! फरासखाना पोलीस स्टेशन, पुणे शहर !
दिनांक ०६/०३/२०२६ रोजी रात्री २०/३० वा. ते २२/०० वा.चे दरम्यान बंटी कॉर्नर बिल्डींग, दुसरा मजला, फ्लॅट नं ०३, पवळे चौक, कसबा पेठ पुणे अज्ञात चोरट्यांनी सेफ्टी दरवाजाचा कोयंडा तोडुन घरात प्रवेश करुन बेडरुम मध्ये ठेवलेले एकुण १३०.३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल गंठण, सोन्याचा लंबहार व लहान मुलाच्या कानातील बाळी व हातातील सोन्याचे मनी असलेले मनगटा, रोख रक्कम ५०,०००/- रु. असा एकुण ११,०७,४००/- रु. किंमतीचा मुद्देमाल फिर्यादी याचे संमती शिवाय घरफोडी चोरी करुन नेला होता. म्हणुन अज्ञात आरोपी विरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. ७२/२०२६ भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे व पोलीस अंमलदार असे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने सदर भागातील खाजगी सी.सी.टी. व्ही चेक करीत असताना पोलीस हवालदार गजानन सोनुने यांनी सदरचे आरोपी ओळखुन त्यांच्या प्राप्त पत्त्यावर जावुन त्यांचा शोध घेत असतांना, त्यांना पोलीस असल्याची चाहुल लागल्याने ते पसार झाले व ते यांचे अस्तिव तसेच राहण्याचे ठिकाण वारंवार बदलुन दिल्ली, अयोध्या, आग्रा, झाशी, लातुर, बार्शी, छत्रपती संभाजीनगर या भागात फिरत होते. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील पोलीसांनी ताब्यात घेतले. सदर गुन्हयाचा तपास पो. हवा. गजानन सोनुने यांचेकडे दिल्यानंतर त्यांनी आरोपी नामे १) चंद्रकांत उर्फ चंद्या अनंत माने, वय ३३ वर्षे, रा. वेताळनगर झोपडपट्टी चिंचवडगाव, चिंचवड पुणे २) रामा उर्फ रामजाने लक्ष्मण क्षिरसागर, वय ३३ वर्षे, रा. गौर वाघोली ता. कळंब, जिल्हा धाराशिव यांना छत्रपती संभाजी नगर येथुन वर्ग करुन घेवुन, त्यांना अटक केले. पोलीस कस्टडी दरम्यान त्यांनी गुन्हयात वापरलेली मोटर सायकल, दरवाजा तोडण्यासाठी वापरलेला अॅडजस्ट टेबल पाना तसेच १३०.३०० ग्रॅम वजनाचे सोने असा सर्व मिळुन १८,४९,४००/- रु किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात फरासखाना पोलीस स्टेशन येथील तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांना यश आले आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गजानन सोनुने हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप-आयुक्त, परि-२ पुणे (अतिरिक्त कार्य. परि.०१), श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन श्री प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. शिवप्रकाश मुळे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस अंमलदार नितीन तेलंगे, गजानन सोनुने, महेश राठोड, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, नितीन जाधव, महेश पवार, चेतन होळकर, सुमित खुट्टे, शशीकांत ननावरे, प्रशांत पालांडे व लोंढे यांनी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























