Homeक्राईमकोंढवा पोलीस ठाणे व मरकजी बैतुल माल फाउंडेशनतर्फे दावत-ए-इफ्तार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

कोंढवा पोलीस ठाणे व मरकजी बैतुल माल फाउंडेशनतर्फे दावत-ए-इफ्तार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दि.२३/०२/२०२६ रोजीचे कोंढवा खुर्द येथे कोंढवा पोलीस ठाणे व मरकजी बैतुल माल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे पवित्र रमजान महिन्याच्या पाचव्या रोजा निमीत्त दावत ए इफ्तार चा सामाजिक सलोखा वृद्धींगत करणारा कार्यक्रम मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या वेळेस पोलीस मा. सह आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री.मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ०५, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, डॉ. संदिप भाजीभाकरे, मा. पोलीस उपआयुक्त, वाहतुक शाखा श्री. हिम्मत जाधव, मा.सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई, तसेच बैतुल माल फाउंडेशनचे अल्ताफ मर्चंट, आबीद सय्यद, हाजी तौसीफ शेख, कौसरबाग ट्रस्टचे अध्यक्ष सलीम शेख, विद्दमान नगरसेवक हाजी गफुर पठाण, मजहर मणियार, कौसरबाग मस्जिद मौलाना कारी अब्दुल्ला, जाहिदभाई शेख अध्यक्ष महाराष्ट्र अॅक्शन कमिटी, वसिमभाई बागवान, बासित शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कोंढवा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी मा. पोलीस आयुक्त यांनी जमलेल्या नागरिकांना केलेल्या भाषणात रमजान महिन्यामध्ये कोंढवा परिसरामध्ये नागरिकांना सायंकाळी उपवास सोडण्याकरीता मस्जिद परिसरात जाण्यासाठी वाहतुकीच्या अडचनींना सामोरे जावे लागु नये याकरीता पोलीस दलातर्फे जास्तीत जास्त सुरळीत वाहतुक ठेवण्याकडे आमचे अधिक लक्ष राहणार आहे.

तसेच रमजान या पवित्र सणाच्य कालावधीमध्ये कोंढवा परिसरामध्ये जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत आणि ते त्रास देत असतील त्यांची माहिती पोलीसांना दयावी त्यावर पोलीस दलाकडून अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी सुचना दिली आहे. रमजान या पवित्र सणामध्ये पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबध्द असल्याबाबतचे ही त्यांनी सांगितले. तसेच युवकांमध्ये अंमली पदार्थांचे प्रमाण वाढत असून त्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली असून अंमली पदार्थ शहरातून हद्दपार करण्याकरीता पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मा. सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे उल्लंघन होवू नये म्हणून नमाजकरीता होणा-या अजानकरीता कौसरबाग सोसायटी कमिटी यांचेकडून मोबाईलवर वापरता येणारे ऑनलाईन अजान अॅप्लीकेशन तयार केले. असून त्याचे उदघाटन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे हस्ते करण्या आलेले आहे. सदरचे अॅप वापरणेबाबत नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे.

नमुद कार्यक्रमाचे आयोजन मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. कुमार घाडगे काढेंवा पोलीस ठाणे, पुणे शहर, पोलीस निरीक्षक ( गुन्हे), नवनाथ जगताप,कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन इस्माईल आगवान यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!