संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर.
दिनांक 22/०७/२०२५ रोजी पुणे शहर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना *पोलीस हवालदार 109 रणजीत फडतरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन गुन्हा र. नंबर 204/2022 भा द वि 307, 504, मोका 3(१)३(२)३(४)* अन्वये पाहिजे आरोपी नामे *अहमद वाहिद शेख, वय 30 वर्ष, राहणार 611 कासेवाडी पुणे* यास महात्मा फुले वाडा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून मा.सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा पुणे शहर,माननीय श्री. राजेंद्र मुळीक सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली व शैलेश शंखे पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या सूचनेप्रमाणे सपोनि राजेश माळेगावे, पोउनि रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार रणजीत फडतरे, रवींद्र फुलपगारे, नितीन कांबळे, प्रवीण ढमाळ , राजेंद्र लांडगे यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























