Homeक्राईमलोणीकंद पोलिसांची धडक कारवाई : १३,५०० लिटर कच्चे रसायन व ६,७०० लिटर...

लोणीकंद पोलिसांची धडक कारवाई : १३,५०० लिटर कच्चे रसायन व ६,७०० लिटर गावठी दारू जप्त; हातभट्टी उध्वस्त, आरोपी जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर !

वरिष्ठांनी फ्लश आऊट ऑपरेशन राबविणेबाबत तसेच अवैध गावठी दारुच्या भट्टया उध्वस्त करून अवैध दारु विक्री करणारे यांच्यावर कायदेशिर कारवाई करणेबाबत आदेशित केलेने दिनांक १३/०४/२०२६ रोजी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अमलदार पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गावठी हातभट्टया लावणारे व गावठी दारु विक्री करणा-यांवर कारवाई करणेकरीता पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार जाधव यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, मौजे हिंगणगाव, ता. हवेली, जि. पुणे येथील शेतकरी संतोष बाळासाहेब मुरकुटे यांचे शेताचे पश्चिम बाजुस असलेल्या जंगल परिसरात मोकळया जागेत पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नामे सचिन मकनसिंग नानावत, वय २७ वर्ष, रा. रामकृष्ण हरी मंगल कार्यालयाचे मागे, राहु रोड, आष्टापुर फाटा, पुणे याने त्याचे साथीदारांचे मदतीने गावठी दारु तयार करण्यासाठी मोठया प्रमाणात कच्चे रसायन तयार केले असुन तो रात्रीचे वेळी गावठी दारु काढणार आहे.
नमुद बातमी मिळताच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे व पोलीस स्टाफ यांनी मौजे हिंगणगाव, ता. हवेली, जि. पुणे येथील शेतकरी संतोष बाळासाहेब मुरकुटे यांचे शेताचे पश्चिम बाजुस असलेल्या जंगल परिसरात मोकळया जागेत पंचासह २२/०० वा. चे सुमारास छापा टाकुन नमुद ठिकाणी हजर असणारा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नामे सचिन मकनसिंग नानावत, वय २७ वर्ष, रा. रामकृष्ण हरी मंगल कार्यालयाचे मागे, राहु रोड, आष्टापुर फाटा, पुणे हा पळुन जावुन लागल्याने त्यास पोलीस स्टाफने पाठलाग करुन ताब्यात घेतले.
त्यावेळी नमुद ठिकाणी पोलीसांना पांढरे रंगाच्या वेगवेगळया प्लॅस्टिकची टाक्यांमध्ये मनुष्यास गुंगी येईल असा आंबट व उग्र वासाचे अंदाजे एकुण १३,५०० लीटर गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन, तसेच प्लॅस्टिकचे काळे रंगाचे कॅन्डांमध्ये व काही टाक्यांमध्ये अंदाजे एकुण ६७०० लीटर गावठी हातभट्टीची तयार दारु मिळुन आली. तसेच हातभट्टी लावण्यासाठी लागणारे लोखंडी भांडी, प्लॅस्टिकच्या टाक्या, सरपण असा एकुण १३,१२,५००/- रु. की. चा मुद्देमाल मिळुन आल्याने पोलीस रेकॉर्डवरील आरोपी सचिन मकनसिंग नानावत, वय २७ वर्ष, रा. रामकृष्ण हरी मंगल कार्यालयाचे मागे, राहु रोड, आष्टापुर फाटा, पुणे याचेविरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ७, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग, श्रीमती नुतन पवार यांचे मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस स्टेशन, श्रीमती सुनिता रोकडे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, पोलीस अंमलदार स्वप्नील जाधव, कैलास साळुंके, सागर जगताप, संतोष अंदुरे, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, सुधीर शिवले व दिनेश मरकड यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!