Homeक्राईममौजमजेसाठी सायकल चोरी करणारा विधिसंघर्षित बालक येरवडा पोलिसांच्या ताब्यात; १५ सायकली जप्त.

मौजमजेसाठी सायकल चोरी करणारा विधिसंघर्षित बालक येरवडा पोलिसांच्या ताब्यात; १५ सायकली जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, नागपुर चाळ या भागात सायकल चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होवुन त्यात सीसीटीव्ही तपासामध्ये लहान मुलांचे माध्यमातुन ही चोरी केलेची माहिती समोर आली होती. सदर बाबत तात्काळ कार्यवाही करणेबाबत मा. वरीष्ठांनी सुचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन श्री. अंजुम बागवान यांचे सुचनांप्रमाणे येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोलीस अंमलदार बालाजी सोगे व सोमनाथ गायकवाड यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की महाराष्ट्र हौसिंग बोर्ड व नागपुर चाळ भागात सायकल चोरी केलेला लहान मुलगा हा त्याचे आजीसह नवी खडकी येरवडा येथे राहणेस आहे

अशी माहिती मिळाल्यावर सदर मुलाचे पालकांना संपर्क करुन त्यास त्याचे पालकांचे समक्ष विश्वासात घेऊन विचारले असता त्याने त्याची आई हयात नसुन वडील व आजोबा एका गंभीर गुन्ह्यात जेल मध्ये आहेत त्यामुळे त्याचा सांभाळ करण्यासाठी घरी कोणी नाही आणि मौजमजेसाठी पैसे लागतात याकरीता त्याने सायकल चोरी केल्याचे सांगितले. सायकल चोरी करण्यासाठी सदर विधिसंघर्षित बालक हा दिवसा त्या भागात जाऊन पाहणी करत असे आणि नंतर रात्रीचे वेळी त्याठिकाणी कोणीही नसताना सायकल चोरी करुन घेऊन जात असे. सदर विधिसंघर्षित बालकाकडुन एकूण १५ सायकली असा एकुण १,००,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४, श्री. चिलुमूला रजनिकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग. श्री. सुनिल जैतापुरकर यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन श्री. अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. कैलास डाबेराव, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक किशोर बेरड, पोलीस अंमलदार मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, संदिप जायभाय, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार, बालाजी सोगे, गणेश पालवे, अनिल मन्हाळकर, सोमनाथ गायकवाड यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!