Homeक्राईमअंमली पदार्थ विरोधी पथक-१ ची धडक कारवाई; २१ लाखांचा एम.डी. साठा हस्तगत.

अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ची धडक कारवाई; २१ लाखांचा एम.डी. साठा हस्तगत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! अंमली पदार्थ विरोधी पथक-१ गुन्हे शाखा पुणे शहर !

मा. वरिष्ठांनी अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करणेबाबत मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी यापुर्वीच आदेशीत केले आहे.

दि.०५/०६/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांचेसह पोलीस अधिकारी व स्टाफ असे हद्दीत गस्त करीत असताना पोलीस अंमलादर निशिकांत सावंत यांना एच.पी. पेट्रोलपंपापासुन थोड्या अंतरावर बसस्टॉप शेजारी, मुंढवा खराडी रोड, पुणे येथे एक इसम संशयितरित्या उभा असल्याचे दिसुन आले. त्यास ताब्यात घेवुन त्यांच्याकडे विचारपुस करता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने सदर इसमाची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपी नामे इमरान युसुफ शेख वय ३८ वर्षे रा. स.न.१४/७९ थिटेनगर दत्त मंदीरजवळ, विरभद्री बिल्डींग शेजारील इमारत, तिसरा मजला थिटेवस्ती खराडी पुणे मुळगाव गायरी मोहल्ला बसद, पुराना मश्जिद जवळ, प्रतापगढ राजस्थान याचे ताब्यात एकुण कि रु २०,९८,४००/- चा १०४ ग्रॅम ९२ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द खराडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १९२/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा मेफेड्रोन (एम.डी) हा अंमली पदार्थ कोठुन आणला व कोठे विक्री करणार होता याबाबत अधिक तपास करीत आहेत.

एकुण हस्तगत मुद्देमाल

कि.रु. २१,०८,४००/- चे ऐवज कि रु २०,९८,४००/- चा १०४ ग्रॅम ९२ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) व त्यामध्ये कि रु १०,०००/- ची एक मोबाईल फोन, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संजय दराडे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री गौहर हसन, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे ३ श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, यांचे सुचनांप्रमाणे सहा.पो.निरी. अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार निशिकांत सावंत, अमोल सरडे, रिहान पठाण, संजय राजे, निलेश जाधव, अतुल क्षिरसागर, सचिन लोहार, विजय कांबळे, तुषार साळुंखे, राहुल शिंदे, आशा भिंगारे, जान्हवी सुर्यवंशी, मंगेश गुंड, अक्षय शिर्के यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!