Homeक्राईमपरिमंडळ ५ मधील कोंढवा पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्हयातील आरोपीस सश्रम कारावासासह...

परिमंडळ ५ मधील कोंढवा पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्हयातील आरोपीस सश्रम कारावासासह जन्मठेपेची शिक्षा.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स !ऑनलाईन पुणे *

सदर घटना ही कात्रज कोंढवा रोड, केसर लॉजच्या मागील मोकळया मैदानात, गगन उन्नती सोसायटीसमोर, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे दिनांक २२/०६/२०१९ रोजी ००:३० ते ००:४५ वाजताच्या दरम्यान घडली आहे. यातील आरोपी तपिश पुखराज चौधरी, वय २६ वर्षे, रा. गगन उन्नती सोसायटी, शॉप नं. १८, ईस्कॉन मंदिराशेजारी, कोंढवा, पुणे मूळ रा. ३२ बी, न्यू पाली रोड, भगत की कोठी, जोधपूर, राजस्थान याने त्याचे मोबाईलवरुन सिद्धार्थ सिंग या नावाने सुनिल रघुनाथ शास्ती, वय ५२ वर्षे, रा. प्लॉट नं. ६३, घरकुल प्रॉपर्टीज, पठारे वस्ती, लोहगाव, पुणे हे ड्रायव्हर असलेली ओला ( ओला फ्लीट टेक्नॉलॉजीज प्रा.लि.) कंपनीची स्विफ्ट डिझायर कार क्र. MH – 12-QG- 8987 ही कार प्रवासी म्हणून बुक करुन त्या कारमध्ये बसून कात्रज कोंढवा रोड, केसर लॉजच्या मागील मोकळया मैदानात, गगन उन्नती सोसायटीसमोर, कोंढवा बुद्रुक, पुणे येथे जाऊन कापडी गमच्याच्या साहाय्याने सुनिल शास्त्री (मयत) यांचा गळा आवळून त्यांचा खून करुन त्यांचा मृतदेह तेथेच मैदानामध्ये टाकून देऊन सुनिल शास्त्री यांचे ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार जबरी चोरी करुन घेऊन गेला व सदर कार बुक करण्यासाठी वापर केलेले सिमकार्ड व सुनिल शास्त्री (मयत) यांचा मोबाईल फोन फेकून पुरावा नष्ट केला. म्हणून कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक ५६१/२०१९ भा.दं.वि. कलम ३०२, ३९७,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास
सदर गुन्हयाचा तपास श्री. संतोष शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, सध्या नेमणूक फरासखाना पोलीस ठाणे यांनी केला व यातील आरोपींविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा सेशन केस क्र. ११६०/२०१९ असा आहे.
शिक्षा
वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपीस दिनांक ०७/०४/२०२५ रोजी सश्रम कारावासासह जन्मठेप व ५० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
कामगिरी
सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकील श्री. मिलींद दातरंगे व श्री. प्रदिप गेहलोत, कोर्ट पैरवी श्री. महेश जगताप, सपोफौ यांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी सपोफौ महेश जगताप व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी सपोनि श्री. संतोष शिंदे यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वारजे पोलिसांची कारवाई : अल्पवयीनाकडून ६ चोरीच्या दुचाकी हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस...

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

error: Content is protected !!