Homeक्राईमपत्नीच्या अनैतिक संबंधांच्या रागातून चुलत भावाचा गळा चिरून खून! मृतदेह गोणीत भरून...

पत्नीच्या अनैतिक संबंधांच्या रागातून चुलत भावाचा गळा चिरून खून! मृतदेह गोणीत भरून डोंगराळ भागात फेकून देणारा आरोपी भारती विद्यापीठ पोलिसांच्या सापळ्यात अटक.

संपादक फिरोज खाटीक :-9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दिनांक १९/११/२०२५ रोजी तक्रारदार नामे विजय महादेव कुमार, वय ३७ वर्षे, लेबर ठेकेदार, रा. गेडा बरखंट्टा, तहसील जिल्हा हजारीबाग, राज्य झारखंड, सध्या रा. लेन नंबर ३ म्हसोबा मंदीराजवळ, टिळेकर नगर, कोंढवा, बु, पुणे यांनी कळविले की, त्यांचेकडील कामगार नामे अजयकुमार गणेश पंडीत, वय २२ वर्षे, धंदा लेबरकाम, रा सध्या साईनगर, खोपडेनगर, कात्रज, पुणे मुळ गाव चत्रो, जिल्हा हजारीबाग, झारखंड हा दिनांक १७/११/२०२५ रोजी रात्रौ ०८.०० वा चे सुमारास घरामधुन भाजी घेवुन येतो असे सांगुन निघुन गेला आहे तो परत घरी आला नाही म्हणुन तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मनुष्य मिसींग क्रमांक १५१/२०२५ अन्वये दिनांक १९/११/२०२५ रोजी १४.४६ वा. दाखल केली आहे.
सदर घटनेच्या अनुशंगाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना मिसींग व्यक्तीचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ हे मिसींग व्यक्तीबाबत माहीती घेत असताना सदर घटनेबाबत काही संशयास्पद बाबी प्राप्त झाल्या व मिसींग मनुष्य याचे त्याचा चुलत भाऊ अशोक पंडीत यांचे पत्नी सोबत अनतिक संबध असल्यामुळे त्यांचेमध्ये वादविवाद झाले होते अशी माहीती तपास पथकातील पोलीस अंमलदार अभी चौधरी, मितेश चोरमोले यांना प्राप्त झाली. त्यापुढे अशोक पंडीत याचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण पोलीस अंमलदार सागर बोरगे यांनी करुन तो पिंपरी चिंचवड भागात असल्याची माहीती मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस अंमलदार संदिप आगळे व तुकाराम सुतार यांनी पिंपरी चिंचवड भागात जावुन अशोक पंडीत याचा शोध घेतला असता तो मिळुन आला. त्याचेकडे मिसींग व्यक्ती अजयकुमार पंडीत याचेबाबत अधिक तपास करता त्याने सांगितले की, त्याचे पत्नीचे अजयकुमार गणेश पंडीत याचे सोबत अनैतिक संबंध होते. त्या कारणावरुन दिनांक १७/११/२०२५ रोजी रात्री २१.३० वाजताचे सुमारास खोपडे नगर येथे डोंगरामध्ये झाडीत अजय कुमार पंडित यास गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून ठार करून त्यास गोणीमध्ये भरून गुजर निंबाळकरवाडी डोंगरामध्ये फेकून दिले असल्याचे सांगितले. पुढे अशोक कैलास पंडीत याने गुजर, निंबाळकवाडी येथील डोंगरामध्ये झाडाझुडपात मिसींग व्यक्ती अजयकुमार पंडीत याची बॉडी जेथे पोत्यामध्ये फेकली ते ठिकाण दाखविले. तेथे जावुन झाडाझुडपात पाहणी केली असता तेथे पांढरे रंगाचे गोणीच्या पोत्यामध्ये मिसींग व्यक्ती अजयकुमार पंडीत याची बॉडी मिळुन आली आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपीतास अटक करण्यात आली आहे.
अशा प्रकारे मिसिंग व्यक्तीचा शोध घेत असताना त्याचा खुन झाल्याचे उघडकीस आणुन, ३६ तासात आरोपी निष्पन्न करुन, मिसींग व्यक्तीचा मृतदेह शोधुन, सदर गंभीर प्रकरण भारती विद्यापीठ पोलीसांनी उघडकीस आणले
आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. मनोज पाटील साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, स.पो.नि. स्नेहल थोरात, समीर शेंडे, स्वप्नील पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रवी जाधव पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, दिपक फसाळे, सचिन सरपाले, संदीप आगळे, तुकाराम सुतार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, अवधुत जमदाडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, नवनाथ खताळ, निलेश खैरमोडे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!