Homeक्राईमखानापूरमधील दिवसाढवळ्या सराफ दरोड्याचा ४८ तासांत पर्दाफाश; ५६ तोळे सोने हस्तगत, २...

खानापूरमधील दिवसाढवळ्या सराफ दरोड्याचा ४८ तासांत पर्दाफाश; ५६ तोळे सोने हस्तगत, २ आरोपी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

हवेली पोलीस स्टेशन गु.र.नं. १३० / २०२५ बी. एन. एस. ३१० (२) आर्म अॅक्ट ४, २५ प्रमाणे दि. २६ / १२ / २०२५ रोजी गुन्हा दाखल आहे. दि. २६/१२/२०२५ रोजी दुपारी १२ / ३० वा सुास दिवसाढवळया अनोळखी पाच दरोडेखोरांनी हातात तलवार, कोयता अशी हत्यारे घेवून खानापूर गावातील वैष्णवी ज्वेलर्स या सराफ दुकानावर सशस्त्र दरोडा टाकून दुकानातील मालक व महिला कामगार यांना हत्याराचा धाक दाखविला आणि सुमारे ८४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे किं.रू. १,०५,००,०००/-चा मुद्देमाल चोरून नेला होता. सदर प्रकाराबात दुकान मालक यांच्या पत्नी सौ राणी अमोल बाबर वय २८ वर्षे, व्यवसाय- सोनार दुकान, रा. खानापूर, ता. हवेली जि. पुणे मुळ रा. वाळज शिवेचा मळा ता. खानापूर जि. सांगली यांनी वरील प्रमाणे फिर्याद नोंदविली आहे.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून मा. पोलीस श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, यांनी घटनास्थळी भेट दिली. सराफ दुकानावर भर दिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने खानापूर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरोडेखोरांनी भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकल्याने एक प्रकारे पोलीसांना आव्हान केले होते. दरोडेखोरांचे ते आव्हान पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल सो यांनी स्विकारून गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने स्थानि गुन्हे शाखेची चार पथके, हवेली पो स्टे व वेल्हे पो स्टे कडील तपास पथके अशी एकूण ६ तपास पथके तयार केली गुन्हा उघडकी आणण्याचे अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन व सुचना देण्यात आल्या. दरोडेखोर हे दरोडा टाकलेनंतर पानशेत च्या दिशेने गेल्याचे साक्षीदार यांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने स्था.गु. शा. चे पो. नि. अविनाश शिळीमकर यांचे नेतृत्वाखाली तपास पथकांमार्फत दरोडेखोरांचा शोध सुरू करणेत आला.

सदर गुन्हयात दोन मोटार सायकलचा वापर झालेला होता, एकूण पाच दरोडेखोर निष्पन्न करणेत आले, तपास पथकांनी सीसीटीव्हीचे आधारे मोटार सायकल चा मागोवा घेण्यास सुरूवात केली. ठिकठिकाणी नाकाबंदी लावणेत आली. दरोडेखोर यांनी दोन्ही मोटार सायकल वेगवेगळया रस्त्याने वेल्हे गावाचे दिशेने नेल्याची माहिती प्राप्त झाली. तपास पथकांनी सलग दोन दिवस, दिवस-रात्र तपास करून गुन्हयातील मोटार सायकल घेवून दरोडेखोर हे वेल्हे तालुक्यातील सिंगापूर डोंगरात जंगलाकडे गेल्या असल्याचे निष्पन्न झ गले. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजचे आधारे गोपनीय बातमीदार सतर्क करणेत आले असता, पथकातील स्था.गु.शा. चे पो.हवा. अमोल शेडगे यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, गुन्हयातील मुख्य आरोपी हा अंकुश दगडू कचरे रा. सिंगापूर मोहरी, पो. वरोती, ता. वेल्हे जि. पुणे हा असून त्याने त्याचे इतर साथीदाराचे मदतीने गुन्हा केला आहे. मिळालेल्या माहितीची खात्री करून दि. २८/१२/२०२५ रोजी आरोपी १) अंकुश दगडु कचरे, वय २० वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर, सध्या रा. जैन मंदिराजवळ, साईनगर कात्रज, पुणे, मुळ रा. रा. सिंगापूर मोहरी, पो. वरोती, ता. वेल्हे जि. पुणे २) गणेश भांबु कचरे वय २३ वर्षे, रा. जैन मंदिर, वाघजाईनगर कात्रज, पुणे, मुळ रा. हारपुड, पो. वरोती, ता. वेल्हे जि. पुणे यांना सिंगापूर डोंगरातील जंगलातून ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपींकडे चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे इतर साथीदार तीन विधीसंघर्षित बालक यांचे मदतीने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना विश्वासात घेवून तपास केला असता, त्यांचेकडून गुन्हयात वापरलेला कोयता व ५६ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा किं.रू. ७०,३२,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता दि. ०५/०१/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करणेत आलेली आहे. यातील मुख्य आरोपी अंकुश दगडू कचरे याचेवर यापुर्वी शरिराविरूद्धचे एकूण ०३ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनीलकुमार पुजारी, हवेली विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्र मायने, आ. गु.शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो. नि. वैशाली पाटील हवेली पोस्टे, स.पो.नि. किशोर शेवते वेल्हे पो स्टे, स्था.गु.शा.चे स.पो.नि. महादेव शेलार, स. पो. नि. दत्ताजीराव मोहिते, पोसई हनुमंत पासलकर, हवेली पो स्टेचे पोसई शितल टेंबे, पोस संजय सुतनासे, पोसई सुभाष गिरे, पोसई दिलीपराव शिंदे, पोलीस अंमलदार रामदास बाबर, अमोल शेडगे, मंगेश थिगळे, मंगेश भगत, तुषार भोईटे, सागर नामदास, गणेश धनवे, संतोष तोडकर, संतोष भापकर, युवराज सोमवंशी, राजु मोमीण, योगेश नागरगोजे, राहूल पवार, दिपक साबळे, संदिप वारे, भारत मोहोळ, अतुल डेरे, अक्षय नवले, सचिन गुंड, दिपक गायकवाड, चालक बाळासाहेब पुंड, चालक अजय देडे, विजय मारणे, अशोक तारू, अजय पाटसकर, समाधान चोरमले, ऋषिकेश गायकवाड, अनिकेत काळे, स्वप्निल साळुंखे, प्रशांत दरेकर, रमेश फडतरे, विजय कांबळे, चालक दिलीप आंबेकर राजेंद्र आवदे, रोहित मरभळ, आकाश पाटील, चालक सोमनाथ जाधव, स्वप्निल साळुंखे, निलम निकम, स्नेहल कामठे, पोलीस पाटील गणेश सपकाळ होमगार्ड विजय कटके यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!