संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
कोथरुड पोलिसांची यशस्वी कामगिरी — हवेली पोलीस ठाण्यातील पाहिजे आरोपी अटक
दिनांक १४/११/२०२५ रोजी रात्री कोथरुड पोलीस स्टेशन हद्दीत कोंबिंग ऑपरेशन दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कोथरुड पोलिसांनी हवेली पोलीस स्टेशनमधील पाहिजे असलेल्या आरोपीला शिताफीने अटक केली.
अंमलदार क्र. १०७४१ खरात यांना मिळालेल्या बातमीदारामार्फत माहितीप्रमाणे हवेली पोलीस स्टेशन गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपी प्रकाश उर्फ लाल्या शांताराम येवले (वय २७, रा. शिवकल्याणनगर सुतारदारा, कोथरुड, पुणे) हा चार नळ चौक, सुतारदारा, कोथरुड येथे थांबलेला असल्याची माहिती मिळताच तातडीने पथक तयार करून सदर ठिकाणी धाड टाकण्यात आली.
पोलिस उपनिरीक्षक एच. एस. केंजळे तसेच पोलीस अंमलदार १०७४१ खरात, ८४०६ पठाण, ५७० माने, १०२६९ पोटभरे, ३८४ मंडले, ४६९४ बोरकर (सर्व नेमणूक कोथरुड पोलीस स्टेशन) यांनी समन्वयाने कारवाई करून आरोपीस ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने हवेली पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याची कबुली दिली.
हवेली पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे आरोपीवर गुन्हा रजि. क्रमांक ६९/२०२५ प्रकरणात भा.दं.वि. कलम १०९, ३३३, १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३२४(५), ३५२, ३५१(२), ३५१(३) तसेच आर्म्स अॅक्ट ३(२५), २७ व ४(२५) व क्रिमिनल लॉ (अमेंडमेंट) अॅक्ट कलम ३, ७ अन्वये गंभीर गुन्हे दाखल असून आरोपी मागील ५ महिन्यांपासून फरार होता.
अटक झालेल्या आरोपीची ससून हॉस्पिटल येथे MLC तपासणी (MLC No. 10009/2025) करून त्यास पुढील कार्यवाहीकरिता हवेली पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार एस. जी. तोडकर, पो. अंमलदार २४०३ एस. एस. भापकर व पो. अंमलदार ७७ अनिकेत काळे यांच्या ताब्यात रात्री ०२.४५ वाजता देण्यात आले.
कोथरुड पोलीस स्टेशनकडून केलेल्या शिताफीच्या व तात्काळ प्रतिसादात्मक कारवाईमुळे हवेली पोलीस स्टेशनमधील गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे आरोपीला अटक करणे शक्य झाले.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























