Homeक्राईमकोंढवा पोलिसांचा मोठा दणका! बांधकाम व्यावसायिकांना खंडणी उकळणाऱ्या 'पठाण टोळी'वर मोक्का अंतर्गत...

कोंढवा पोलिसांचा मोठा दणका! बांधकाम व्यावसायिकांना खंडणी उकळणाऱ्या ‘पठाण टोळी’वर मोक्का अंतर्गत कारवाई.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२६ रोजीच्या दरम्यान फिर्यादी नामे अकबर मेहबूब खान, वय ३६ वर्षे, धंदा लेबर कॉन्ट्रॅक्टर, राः स.नं. ११०, रामटेकडी, विठ्ठल मंदिर समोर, हडपसर, पुणे हे त्याचे मालकीच्या पुणे महानगरपालिका यांचे हद्दीतील गांव मौजे कोंढवा खुर्द येथील स.नं. ३८, हिस्सा नं. २ येथील जमिनीवर बांधकाम करत असताना वेळोवेळी आरोपी नामे १) शफी गुलजारखान पठाण वय ६६ वर्षे, त्यांचा मुलगा २) समीर शफी पठाण वय ३५ वर्षे, दोघे रा. पारगेनगर, कोंढवा पुणे ३) कमल नितिन खैरनार, वय ६२ वर्षे रा. धर्मावत पेट्रोल पंपाचे मागे पिसोळी ४) साजीद हसन शेख, वय ४० वर्षे रा. पोकळे मळा, पारगेनगर पुणे यांनी दमदाटी करुन बांधकामाबाबत पुणे महानगरपालिका यांचेकडे वेळोवेळी खोट्या तक्रारी करुन त्यांचे बांधकामावर कारवाई केल्याने सदरच्या तक्रारी न करण्यासाठी व बांधकाम नियमीत करु देण्यासाठी वेळोवेळी २५ लाख रु रोख व एक २ बी.एच. के फ्लॅटची मागणी करून बांधकाम बंद पाडण्याची भिती घालुन खंडणी स्वरूपात १५,००,०००/-स्विकारले आहेत. म्हणुन कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ३५०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३५१ (२) (३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

दाखल गुन्हयातील आरोपी यांचेविरूध्द यापुर्वी अशाच प्रकारचे खंडणीचे गुन्हे दाखल असुन त्यांची संघटीत गुन्हेगारी टोळी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचेविरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदयान्वये कारवाई करणेकामी श्री. संतोष खेतमाळस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, रविंद्र गावडे व सर्वेलन्स पथकाकडील सपोफौ शेखर कोळी, पो.अं. १०१५५ नितीन चव्हाण, पो.अं. ८८८२ गिरीश एकोर्गे, पो.अं. ८५८ सागर माने यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदया अंतर्गत प्रस्ताव तयार करून श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०५, पुणे शहर यांचे मार्फतीने श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे यांचेकडे सादर केला असता त्यांनी सदर प्रस्तावाला मंजुरी देवुन दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (ii), ३ (२). ३(४) प्रमाणे कलमवाढ करून दाखल गुन्हयाचा तपास श्री. रामदास इंगवले, मा. सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर यांचेकडे वर्ग करणेबाबत आदेशित केले.

त्यानंतर दाखल गुन्हयाचा तपास श्री. रामदास इंगवले, मा. सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर करीत असताना दाखल गुन्हयातील आरोपी नामे १) शफी गुलजारखान पठाण, वय ६६ वर्षे, रा. स.नं.३८, पोकळे मळा, पारगेनगर, अल्लाउद्दीन मस्जिदच्या जवळ, कोंढवा खुर्द, पुणे २) समीर शफी पठाण, वय ३६ वर्षे, रा. स.नं.३८, पोकळे मळा, पारगेनगर, अल्लाउद्दीन मस्जिदच्या जवळ, कोंढवा खुर्द, पुणे यांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारे कोणीही कायदयाचा गैरवापर करून खंडणी मागत असल्यास नागरिकांनी समोर येवुन तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वरील नमुद कारवाई ही श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, श्री संजय दराडे, पोलीस सह आयुक्त. श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५, श्री. रामदास इंगवले, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, संतोष खेतमाळस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रशांत मंडले, पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, सपोफौ शेखर कोळी, पो.अं. १०१५५ नितीन चव्हाण, पो.अं. ८८८२ गिरीश एकोर्गे, पो.अं. ८५८ सागर माने यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंदननगर पोलिसांची मोठी कामगिरी; ठाण्यातून आरोपी महिला अटक, चोरीचे सर्व दागिने हस्तगत.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! चंदन नगर पोलीस स्टेशन पुणे शहर ! वयोवृद्ध...

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

error: Content is protected !!