मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610
सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर !
दि. ३०/०७/२०२६ रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दित वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र राहाणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक किरण पवार व तपास पथकातील पोलीस अंमलदारासह पोलीस स्टेशन हद्दित पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अमोल दबडे, अमित चिव्हे व स्वप्निल घुगे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन तपास पथक प्रमुख पोलीस उप-निरीक्षक किरण पवार यांनी सापळा रचुन आरोपी नामे क्षितिज काळुराम मोहोळ, वय १९ वर्षे, रा. स.नं. २१४, मांगिरबाब चौकाजवळ, दांडेकर पुल पुणे यास अत्यंत शिताफीने पकडुन त्याचे ताब्यातुन एकुण अंदाजे ४१,०००/- रु. किं.चे १ देशी बनावटीचे पिस्तुल व २ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असुन सदर आरोपी विरुध्द पर्वती पोलीस स्टेशन येथे गुरनं. २४८/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-०२ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री. गजानन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन श्री. राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमोल दबडे, अमित चिव्हे, स्वप्निल घुगे, मनोज बनसोड, राकेश सुर्वे, सुर्या जाधव व गणेश तरंगे यांनी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























