Homeक्राईमकामाच्या बहाण्याने घरात घुसून चोरी करणा-या परप्रांतीय आरोपीस मध्यप्रदेश मधून बिबवेवाडी पोलीसांनी...

कामाच्या बहाण्याने घरात घुसून चोरी करणा-या परप्रांतीय आरोपीस मध्यप्रदेश मधून बिबवेवाडी पोलीसांनी ठोकल्या बेड्या.

मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610

 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

बिबवेवाडी पोस्टे गु.र.नं. ९८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ) मधिल फ़िर्यादी नामे विनायक रामचंद्र निकम. वय ६२, धंदा सेवानिवृत्त रा. बंगला नं ११, मरगुबाई कृपा समर्थ सोसायटी पोकळे वस्ती बिबवेवाडी पुणे ४११०३७. दिनांक २१/११/२०२५ रोजी पासून फ़िर्यादी यांचे घराचे रिनोवेशनचे काम चालू होते. घरातील एक हिरव्या रंगाच्या लाकडी टेबलच्या मधल्या ड्रॉवर मध्ये जांभळ्या रंगाचे दोन पी अॅन्ड जी बॉक्स ठेवलेले होते. त्यापैकी एका बॉक्समध्ये सोन्याची चैन व दुसऱ्या बॉक्समध्ये सोन्याचा ऐश्वर्या हार ठेवलेलाहोता.

घराचे वरच्या मजल्यावरील काम चालू करायचे असल्याने फिर्यादी व त्यांचे कुटुंब दि. १०/०२/२०२६ रोजी घराचे खालच्या मजल्यावर शिफ्ट झाले. दि. १२/०२/२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० वा. चे सुमारास फिर्यादी यांच्या पत्नीने घराचे वरच्या मजल्यावरील टेबलचे ड्रॉवर मधील पी अॅन्ड जीचे बॉक्स तपासले असता त्यामध्ये सोन्याची चैन व ऐश्वर्याहार तसाच होता. दि. २६/०४/२०२६ रोजी मुलाचा साखरपुडा असल्याने फ़िर्यादी यांचे पत्नीने वरच्या मजल्यावरील टेबलचे ड्रॉवरमधील सोन्याचे दागिने पाहीले असता ते मिळून आले नाहीत. त्यामुळे सोन्याचे दागिने घरामध्ये सर्व ठिकाणी शोधले असता ते मिळून आले नाहीत. त्यामुळे खात्री झाली की कोणीतरी अनोळखी व्यक्तिने घरातील टेबलचे ड्रॉवर मधील सोन्याचे दागिने चोरी करून घेवून गेले आहेत. त्यामुळे घरातील सोन्याची चैन व सोन्याचा ऐश्वर्याहार एकून वजन १२ तोळे चोरी गेले बाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे.

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. यांचे आदेशाने तपास पथकातील पोहवा विशाल जाधव आशिष गायकवाड व सुमित ताकपेरे यांनी सदर गुन्ह्याचे अनुषंगाने तांत्रिक विश्लेषन करून सदर चोरी करणारी आरोपी हा मध्यप्रदेश या ठिकाणी असल्याचे निष्पन्न केले.

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे यांचे मार्गदर्शनाने व वरिष्ठांच्या परवानगीने व त्यांनी दिलेल्या सुचनां प्रमाणे तपास पथकातील स.पो. फ़ौ. संजय गायकवाड, पोलीस हवालदार विशाल जाधव, आशिष गायकवाड व ज्योतिष काळे असे मध्यप्रदेश येथे जावून सदर आरोपीचा तांत्रिक विश्लेषनाद्वारे शोध घेवून आरोपीस शिताफिने ताब्यात घेवून त्याचेकडे तपास केला असता त्याने त्याचे नाव धर्मेश उर्फ़ धर्मेंद्र चक्रवर्ती असे सांगतले व सदर गुन्ह्याचे अनुषंगाने त्याचेकडे सोन्याची चैन व सोन्याचा ऐश्वर्याहार चोरी बाबत तपास केला असता सदर गुन्हा केल्याचे कबूल केले. व चोरी केलेल्या मुद्देमालपैकी सोन्याची चैन वितळवून दुसरी वस्तू बनवण्या साठी सोन्याची लगड बनवली होती. सदर गुन्ह्यात आरोपीकडून १०० टक्के रिकव्हरी केली आहे. व दाखल गुन्ह्यात अटक करून मा. न्यायालयाचे आदेशाने येरवडा जेल येथे पाठविणेत आले आहे.

(

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहिते परिमंडळ २. पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राहुल आवारे भारती विद्यापीठ विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, स.पो. फ़ौ १२८६ गायकवाड, पोलीस हवा. विनोद जाधव, विशाल जाधव, आशिष गायकवाड, ज्योतिष काळे, सुमित ताकपेरे, शिवाजी येवले, रक्षित काळे, संतोष बनसुडे, राहूल खाडे, दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!