Homeक्राईमचंदननगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : २ वर्षे फरार आरोपी नवी मुंबईतून ताब्यात.

चंदननगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : २ वर्षे फरार आरोपी नवी मुंबईतून ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर !

फिर्यादी नामे संदीप भिमराव भोसले, वय ३८ वर्षे, धंदा- नोकरी, राह. स.नंबर १२, लक्ष्मीनगर, नालंदा मिञ मंडळाजवळ, येरवडा, पुणे-०६ यांना आरोपीत दत्ताञय बबन तावरे, वय ३७ वर्षे, राह. १) १६१०, कोल्हेवाडी, रेठरे बु. ता. कराड, जि. सातारा २) सर्व्हे नंबर ०९, तुकारामनगर, खराडी, पुणे-१४ याने दिनांक १८/१२/२०२२ रोजी त्यांचेकडून पोल्ट्री व्यवसायासाठी ५०,०००/- रुपये घेवून, त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करुन, ०२ दिवसांकरीता फिर्यादींचे पत्नीचा साडेतीन तोळयांचा सोन्याचा गंठण कार्यक्रमासाठी घेवून तो त्यांचे परस्पर मणप्पुरम गोल्ड लोन, चंदननगर शाखा, पुणे येथे दि.१६/०२/२०२३ रोजी गहाण ठेवून त्यावर १,२९,५००/- रूपयांचे सोने तारण कर्ज घेवून फिर्यादींची आर्थिक फसवणुक केल्याने वर नमुदप्रमाणे गुन्हा चंदननगर पोलीस ठाणेस दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचे तपासात सदर आरोपीने आणखी ०३ साक्षीदारांची समपद्धतीने आर्थिक फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले.

सदर गुन्हा दाखल होताच आरोपी दत्ताञय बबन तावरे, वय ३७ वर्षे याने त्याचा वास्तव्याचे पत्ते बदलले. तसेच त्याने त्याचा मोबाईल क्रमांक बदलून बैंक खातीही वापरणे बंद केले होते. पोलीस पथकाने त्याचे वरील पत्त्यांवर जावून शोध घेतला असता तो मिळून आला नव्हता. पोलीसांपासून सदरचा आरोपी त्याचे अस्तित्व बदलत होता.

मा. वरिष्ठांनी सदर गुन्हयाची उकल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नुतन तपासी अधिकारी-सपोनि महेश लामखडे, पोह, किरण घुटे यांनी पाहीजे आरोपीने वापरलेल्या अनेक मो.क्र.चे विश्लेषण करून वापरता मो.क्र. अचुक निष्पन्न करून त्याचा सध्याचा ठावठिकाणा सानपाडा, नवी मुंबई असा निष्पन्न केला. सपोनि लामखडे व पोलीस अंमलदार विक्रम गायकवाड असे पोलीस पथक सानपाडा, नवी मुंबई येथे दिनांक १४/०५/२०२६ रोजी रवाना होवून त्यांनी आरोपीचे मोबाईल क्रमांकाचे लोकेशनवरून स्थानिक परीसर पिंजून काढून गुप्त बातमीदारांचे मदतीने आरोपी दत्ताञय बबन तावरे, वय ३७ वर्षे, यास सानपाडा गावंठाण येथील दाटीवाटीचे लोकवस्तीतून यशस्वीपणे ताब्यात घेतले. सदर आरोपीस आज दिनांक १५/०५/२०२६ रोजी मा. न्यायालयात रिमांडकामी हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास दि. १७/०५/२०२६ रोजी पावेतो पोलीस कस्टडी सुनावली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि लामखडे करीत आहेत.

सदरची प्रशंसनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग- मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि.०७ पुणे- सोमय मुंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त खराडी विभाग, पुणे श्रीमती नुतन पवार, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोह किरण घुटे, पोलीस अंमलदार विक्रम गायकवाड व पथक यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

error: Content is protected !!