Homeक्राईमवाघोली पोलिसांची मोठी कारवाई : एमडी ड्रग्स कारखान्याचा कट उधळला, १.१६ कोटींचा...

वाघोली पोलिसांची मोठी कारवाई : एमडी ड्रग्स कारखान्याचा कट उधळला, १.१६ कोटींचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक १६/०४/२०२६ रोजी २०/०० वा चे सुमा. जोगेश्वरी वजनकाटा, थेऊर रोड, केसनंद, पुणे येथे सार्वजनिक रोडवर व ठिकाणी १) अनिस शम्मू सय्यद वय २८ वर्षे, रा.स.नं.१४५, कल्याणी पार्क, मांजरी बुद्धक, पुणे.२) हरी उत्तम उफाडे वय ३५ वर्षे, रा. अजमेरा बिल्डींग शेजारी, सिद्धार्थनगर, वाघोली, पुणे यांच्या ताब्यात १,१०,०००/-रू. कि. चा ५ ग्रॅम ५ मि.ग्रॅम निव्वळ मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, संगणमताने, अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या, विक्रीकरीता व खाण्यासाठी स्वतःचे कब्जात बाळगताना मिळून आले. तसेच ३) सुमित अशोक घुले वय ४१ वर्षे रा. मांजरी, पुणे, ४) प्रतिक उर्फ सोन्याबापु होले वय ३२ वर्षे रा. लोणीकंद ५) ऋषीकेश अंकुश उर्फ राम यनभर वय २९ वर्षे रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे यांनी विक्री केला म्हणुन वाघोली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२५९/२०२६, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब), २१ (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०७, पुणे शहर श्री. सोमय मुंडे यांनी सदर गुन्हयातील जप्त मुद्देमाल मॅफेड्रॉन या अंमली पदार्थाचे रॅकेट जाळे उघड करण्याबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्यानुसार वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. नंदकुमार गायकवाड यांनी सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांना मार्गदर्शन करुन गुन्हयाचा लवकर तपास करणेबाबत सुचना दिल्या.

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना, वरील अटक आरोपी यांना एमडी ड्रग्सचा पुरवठा करण्यामागे मुख्य सुत्रधार सुमित घुले हा असुन तो त्याच्या साथीदार आकाश अशोक ढवळे याच्या मार्फतीने पुणे शहरातील काही भागात तसेच लोणीकंद, कोरेगाव भिमा, शिक्रापुर, कारेगाव, रांजणगाव, शिरुर ग्रामीण भागामध्ये एमडी अंमली पदार्थ चोरुन विकतात व सन २०१६ मधील कुरकुंभ ड्रग्ज केस मधील जानेवारी २०२५ पासुन जामिनावर असलेला एमडी बनिवणारा विपीनकुमार श्रीरामसागर पंडीत यास मदतीला घेवून ग्रामीण भागामध्ये एमडी बनविण्याचा कारखाना टाकण्याच्या तयारीत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती.

त्या अनुषंगाने पोलीस अंमलदार प्रदीप मोटे, शेखर शिंदे, विशाल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयामधील मुख्य सुत्रधार सुमित घुले यास शिताफीने अहमदाबाद गुजरात येथुन अटक करण्यात आली. मुख्य सुत्रधार सुमित घुले यास एमडी अंमली पदार्थ देणारा रामनिवास रानुराम

बिश्नोई वय २५ वर्षे रा. मुंढवा पुणे यास खराडी थिटे नगर येथुन त्याच्याकडे असलेल्या ६३.६२ ग्रॅम एमडी अंमली पदार्थासह अटक केली. आरोपी आकाश अशोक ढवळे वय २६ वर्षे रा. शिरुर यास कारेगाव येथुन ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपासादरम्यान १५९ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. सुमित घुले व आकाश ढवळे यास एमडी अंमली पदार्थ तयार करण्यासाठी विपीनकुमार श्रीरामसागर पंडीत वय ५४ वर्षे रा. अंधेरी पूर्व हा मदत करणार होता. त्यासदेखील हडपसर भागातून ताब्यात घेवुन नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयामध्ये अदयापपर्यंत ०८ आरोपीना अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयामध्ये आरोपीकडुन अदयापपर्यंत ४५,६०,०००/-रु. कि.चा २२५ ग्रॅम एमडी अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेला आहे.

तसेच आरोपीकडुन गुन्हयात वापरलेल्या बीएमडब्लु कार, स्वीप्ट, ग्लाजा, सारख्या महागड्या गाड्या हस्तगत करुन एकुण १ कोटी १६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करुन अंमली पदार्थाची तस्करी करणारे आरोपीचे सिंडीकेट प्रस्तापीत करण्याचे मनसुबे पोलीसांनी हानून पाडले आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन हे करीत आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ ०७ पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, श्री. सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग पुणे शहर, श्रीमती नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे, श्रीमती पल्लवी मेहेर (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे विजय चंदन सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार प्रदीप मोटे, शेखर शिंदे, विशाल गायकवाड, गहीनीनाथ बोयणे, महादेव कुभारव राहुल तुपारे यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!