Homeक्राईमचारित्र्यावर संशयातून पत्नीचा खून; अपघाताचा बनाव पोलिसांनी केला भंडाफोड.

चारित्र्यावर संशयातून पत्नीचा खून; अपघाताचा बनाव पोलिसांनी केला भंडाफोड.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ६२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०९, १०३(१), भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ मधील आरोपी शुभम श्रीकांत घोडके, वय २९ वर्षे, रा. गल्ली नं. १३. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी पुणे याने दिनांक २४/०३/२०२६ रोजी सायं. ०४.०० वा. त्याची पत्नी सारीका शुभम घोडके, वय २३ वर्षे, रा. गल्ली नं. १३, अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे हिचे चारित्र्यावर संशय घेवून राहाते घरी धारदार हत्याराने वार करुन गंभीर दुखापत करून तिला जिवंत ठार मारून घराचे तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याचा बनाव रचून उपचारकामी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. सदरबाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे एम.एल.सी. प्राप्त होताच तपास पथकातील अंमलदार सुमित ताकपेरे, शिवाजी येवले व संजय गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली असता त्यांना संशयाचा प्रकार दिसून आला. त्यांनी तिचा पती शुभम घोडके याचेकडे चौकशी केली असता त्यानी दिलेल्या जबाबावर संशय आणखी वाढला. त्यावर अधिक चौकशी करता त्यानेच गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच वरिष्ठांना कळवून त्यांचे आदेशान्वये त्यास ताब्यात घेण्यात आले. उपचारादरम्यान जखमी महिला सारिका शुभम घोडके यांना मयत घोषीत केले. त्याबाबत मयताची आई गेणीबाई रुपसिंग चव्हाण, वय ५० वर्षे, रा. गल्ली नं. ११, अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे नमूद आरोपीविरुध्द वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो. यांचे आदेशाने व सुचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक, मालोजी कांबळे, पोलीस हवालदार संजय गायकवाड, विनोद जाधव, विशाल जाधव पोलीस अंमलदार, शिवाजी येवले, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, रक्षित काळे, दत्ता शेंद्रे यांनी दाखल गुन्ह्यातील आरोपीतास तात्काळ ताब्यात घेवून दाखल गुन्ह्याबाबत तपास करता वर नमुद आरोपीने दाखल गुन्हा केलेचे कबूल केले आहे. नमुद आरोपीताची प्रथम पोलीस कस्टडी व नंतर मॅजि. कस्टडिची रिमांड मंजूर करून त्यांना येरवडा कारागृहात जमा करणेत आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार साो, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहिते, परिमंडळ २ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राहूल आवारे, भारती विद्यापीठ विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, सहा. पोलीस फौजदार संतोष पाटील, महिला पोलीस हवालदार संजना काकडे, पोलीस हवालदार संजय गायकवाड, विनोद जाधव, संतोष जाधव, विशाल जाधव, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, शिवाजी येवले, रक्षित काळे, ज्योतिष काळे, राहूल खाडे, दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!