Homeक्राईमसीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला गंडा; १० कोटींपेक्षा जास्त रकमेची ऑनलाईन...

सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला गंडा; १० कोटींपेक्षा जास्त रकमेची ऑनलाईन फसवणूक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! सायबर पोलीस स्टेशन, आर्थिक व सायबर, पुणे शहर !

सायबर पोलीस स्टेशन गु.र.नं १४/२०२६, भा.न्या.सं.क ३०८ (२), ३१९ (२),३१८ (४), ३(५) सह आयटी अॅक्ट कलम ६६ (सी) (डी) या दाखल गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपींनी सीबीआय ऑफीसर असल्याची बतावणी करुन जेष्ठ नागरीकास डिजीटल अरेस्ट करून त्यांच्या आधारकार्डद्वारे त्यांच्या नावे बँकेत बनावट खाते उघडण्यात आले असून सदरचे खाते एका इसमाविरुद्ध दाखल असलेल्या गुन्हयात तपासादरम्यान सापडले असून सदरच्या खात्यावर लोकांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे यामध्ये तुम्हांला व कुटुंबातील सदस्यांना अटक होईल अशी भिती घालून त्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याकरीता फिर्यादी यांची सर्व गुंतवणुक आरोपींनी दिलेल्या बँक खात्यावर ट्रान्सफर करा अशी भिती दाखवून फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरण्यास भाग पाडून त्यांची एकुण रु. १०,७४,६५,०००/- (एकुण रक्कम रु. दहा कोटी चौ-याहत्तर लाख पासष्ट हजार रुपये फक्त) रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली आहे.

नमुद गुन्ह्याच्या तपासात फिर्यादी यांची फसवणूक झालेल्या रकमेपैंकी फिर्यादी यांनी दि. ३०/०१/२०२६ रोजी ७५ लाख रुपये येस बँकेच्या खाते क्रमांक ६५३६२८००००००२३ यावर भरले होते. सदरच्या खात्यावरुन बँक ऑफ महाराष्ट्र च्या तीन वेगवेगळ्या खात्यावर एकूण ६ लाख ५० हजार रूपये पाठविण्यात आले होते. सायबर क्राईम पोर्टल द्वारे प्राप्त माहीती व सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे आरोपी नामे ०१) हर्षद सुभाष धनतोले, रा. कर्वेनगर, व ०२) समर्थ सुरेश देशमुख, वय २४ वर्षे, सध्या रा. कर्वेनगर यांना दिनांक २२/०२/२०२६ रोजी अटक करण्यात आली होती. आरोपी हर्षद धनतोले याने तपासात ए.टी.एम. मधून काढलेली रोख रक्कम हि पाहीजे आरोपी नामे रोहन जाधव रा. सांगवी पुणे याचेकडे दिल्याचे सांगितले होते. आरोपी क्रमांक १ व २ यांचे तपासात त्यांनी वापर केलेले बैंक खात्याद्वारे झालेले फसवणूकीचे २९ गुन्हे / Nerp तक्रारी उघडकीस आलेल्या आहे.

पाहीजे आरोपी रोहन जाधव याचा शोध घेत असताना त्याचा व इसम नामे अमर शिवाजी अत्तरगी, रा. सोलापूर यांचे संबंध असल्याचे दिसून आले, फिर्यादी यांनी त्यांची फसवणूक झालेल्या रकमेपैंकी ०५ लाख रुपये सेंन्ट्रल बैंक ऑफ इंडीयाच्या खात्यावर पाठविल्यानंतर सदरची रक्कम चेक द्वारे कॅश विडॉल केल्याचे दिसून आले. सदरचे बैंक खाते हे इसम नामे अमर शिवाजी अत्तरगी, रा. सोलापूर याचे नावे असल्याचे माहिती प्राप्त झाल्याने मोदीखाना सोलापूर परिसरात सापळा रचून आरोपी क्रमांक ३) अमर शिवाजी अत्तरगी, रा. मोदीखाना सोलापुर यास मोदीखाना परिसरातून ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासकामी सायबर पो.स्टे. येथे आणून त्यांचेकडे तपास केला असता त्यांचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झालेने त्यांना नमूद गुन्ह्यात दि. ०६/०३/२०२६ रोजी अटक करण्यात आलेली आहे. आरोपी क्रमांक ३ चे तपासात महाराष्ट्रातील ०१ गुन्हा उघडकीस आलेला आहे.

सदर गुन्ह्यात आत्तापर्यंत १ कोटी ३४ लाख गोठवण्यात पोलीसांना यश मिळाले असुन एकुण ५, ४३६ बँकामध्ये तक्रारदाराचे पैसे ट्रान्सफर झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री अमितेशकुमार मा. पोलीस सह आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त आर्थिक व सायबर, श्री विवेक मासाळ यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगिता देवकाते, पोलीस उप निरीक्षक श्री अजित बडे, पोलीस अंमलदार साळवे, भोसले, राठोड तसेच महिला पोलीस अंमलदार भडेकर, व चालक मांढरे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!