संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर !
काळेपडळ पो.स्टे. गु.र.नं. १०८/२०२६ भा. न्या. सं . क ३०३ ( २ ) प्रमाणे गुन्हा नोंद असून नमूद गुन्हयातील आरोपीत इसम याचा शोध घेणे कामी काळेपडळ पो.स्टे. कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार हे पो.स्टे.हद्दीतील रिक्षा चोरी झालेल्या ठिकाणी एकुण १०२ सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे फुटेज तपासत असताना पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांस त्याचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पोखराई धरण, उंड्री, पुणे येथे दाखल गुन्ह्यातील चोरी झालेली रिक्षा क्रमांक एम.एच. १२ एससी ५२२३ झाडाखाली पार्क केलेली दिसुन येत आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस स्टाफच्या मदतीने सदर ठिकाणी सापळा रचुन शिताफीने रिक्षामध्ये बसलेल्या इसमास ताब्यात घेवुन, त्यास त्याचे नाव – पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शादाब युसुफ अन्सारी, वय-२५ वर्षे, रा- गल्ली नं. २४, सय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले.

अटक आरोपीकडे केले तपासावरुन आरोपी हा स्क्रॅप झालेल्या रिक्षांचे नंबर चोरी केलेल्या रिक्षांना लावुन त्या रिक्षा वापरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या ताब्यात मिळुन आलेल्या रिक्षाबाबात तपास करून काळेपडळ पोलीस स्टेशन व इतर पोलीस स्टेशनकडील एकूण ०५ गुन्हे उघड करुन ०१ बिनधनी रिक्षा ताब्यात घेतली आहे त्यांची माहिती खालील प्रमाणे-
अ.क्र.
पो.स्टे
गु. रजि. क्र. व कलम
काळेपडळ
२
चंदननगर
१०८/२०२६,भा.न्या.सं.क ३०३ (२) ४२/२०२६ भा.न्या.सं.क ३०३ (०२)
३
आंबेगाव
४
संत तुकारामनगर ४९/२०२६ भा.न्या.सं.क ३०३ (२)
५
वानवडी
२३/२०२६ भा.न्या.सं.क ३०३ (२)
६०/२०२६ भा.न्या.सं.क ३०३ (२)
हस्तगत मुद्देमाल बजाज कंपनीची रिक्षा एम एच १२ एस सी ५२२३ एमएच १२ एच.पी.आरपी ७५७१ एम. एच. १२ केआर २८७६
एमएच १४ एचएम २८३७
किंमत
१९८,०००/-
२०५,०००/-
१८८,०००/-
१९२,०००/-
१९७,०००/-
९८,०००/-
६
एम.एच.१२ व्ही डब्ल्यु ७०४३ एम.एच.१२ क्यु ई ५६५८
वर नमूद आरोपीत इसम याचेकडुन एकुण १०,७८,०००/- रुपये किंमतीच्या ०६ रिक्षा हस्तगत करून वरील गुन्हे उघडकिस आणले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ६, पुणे शहर श्री राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्री. अतुलकुमार नवगिरे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन,श्री.मानसिंग पाटील यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे व गिरीराज जगदाळे यांनी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























