Homeक्राईमवानवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; चेन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी अटकेत.

वानवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; चेन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

पुणे : वानवडी परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळालेल्या दोन आरोपींना वानवडी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत जेरबंद केले आहे. आरोपींकडून गुन्ह्यातील 15 ग्रॅम वजनाची सुमारे 2 लाख रुपये किमतीची सोन्याची चैन आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 05 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 6.40 ते 7.00 वाजण्याच्या सुमारास वानवडी बाजार चौकी हद्दीतील नेताजी नगर परिसरात संतोष कुमार यादव (वय 58, रा. नेताजी नगर, वानवडी) यांच्या गळ्यातील सुमारे 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन दोन अज्ञात इसमांनी पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडी वर येऊन खेचून पळ काढला होता.
या घटनेनंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार वानवडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील तसेच इतर पोलीस स्टेशन हद्दीतील सुमारे 70 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात यश आले.
या कारवाईत पोलिसांनी
बनी नेबेल लीनकन (वय 25, मूळ रा. जमशेदपूर, झारखंड, सध्या रा. संकेत विहार कॉलनी, काळेपडळ, हडपसर, पुणे)
गोलू कुमार अमित कुमार शर्मा (वय 27, मूळ रा. जमशेदपूर, झारखंड, सध्या रा. संकेत विहार कॉलनी, काळेपडळ, हडपसर, पुणे)
या दोघांना अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली MH 12 FR 1793 क्रमांकाची मोपेड गाडी जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून चेन स्नॅचिंगमधील 15 ग्रॅम वजनाची सुमारे 2 लाख रुपये किमतीची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली आहे.
सदर आरोपींना अटक करून पुढील तपास वानवडी पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

बालाजीनगर परिसरातून खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक; गुन्हे शाखेची मोठी कामगिरी.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक...

error: Content is protected !!