संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! सिंहगड रोड पोलीस स्टेशन !
दिनांक ०४/०२/२०२६ रोजी २०.२० वा. चे सुमारास महालक्ष्मी मंदीराचे समोर, पीएमसी शाळेजवळ, वडगाव बुा, पुणे येथे पाच ते सहा अनोळखी इसमांनी येवुन, सफेद रंगाची सुझुकी फ्रॉन्क्स कारच्या काचा फोडुन, तसेच कारमधील दोन इसमांवर धारधार लोखंडी हत्याराने हमला करुन गंभीर जखमी करुन, सदर परीसरात दहशत निर्माण केली होती. सदर घटनेच्या अनुषंगाने सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ४७/२०२६ भा. न्या. सं. क ११८(२), ३२४(४), १८९ (२), १८९ (४), १९०, १९१ सह शस्त्र अधि. कलम ४, २५ सह म.पो. अ. कलम ३७(१), ३७(३), १३५ सह फौजदारी कायदा (सुधारणा) कायदा २०१३ चे कलम ७ अन्वये तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर दाखल गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने मा. वपोनि, श्री विनय पाटणकर यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडील तपासपथक अधिकारी व अंमलदार यांना गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन तपासाबाबत योग्य त्या सुचना देवुन आरोपीत यांचा लवकरात लवकर शोध घेणेबाबत सांगितले होते. त्यानुसार तपासपथक अधिकारी व अंमलदार यांनी घटनेच्या ठिकाणाचे व आरोपीतांचे येण्या जाण्याचे मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची पडताळणी करुन आरोपीत नामे १) अमन अंबीर झारेकरी, वय २२ वर्षे पत्ता – रुम नं. २०२, महालक्ष्मी बिल्डींग, स.नं. १३२, दांडेकर पुल, सिंहगड रोड, पुणे २) निशांत राजेश राऊत, वय २४ वर्षे, पत्ता- चाळ नं. ए ३५ खोली नं. ६, महाडीक चाळ, २७६ अप्पर ओटा, अप्पर इंदिरा नगर, बिबवेवाडी, पुणे १) सुमित अनिल माने, वय २२ वर्षे, रा. १५ नं. चौक, जिजामाता वसाहत, गृहवस्ती, हडपसर, पुणे व ४) स्वप्निल चंद्रकांत गायकवाड, वय २० वर्षे पत्ता – स्वराज मित्र मंडळ, २७६ अप्पर ओटा, बिबवेवाडी, पुणे असे ०४ आरोपीत यांना अटक करण्यात आले व ०१ विधीसंघर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सदर आरोपी यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेले एक दुचाकी वाहन व तिन लोखंडी धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोउपनि / भुपेश साळुंके करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर कारवाई मा. श्री. रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. राजेश बनसोडे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर मा.श्री. संभाजी कदम, पोलीस उप आयुक्त सो, परि. ३, पुणे शहर, मा. श्री. अजय परमार सहा. पोलीस आयुक्त सो, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन यांचे सुचनेनुसार सदरची कामगारी पोउपनि / संतोष भांडवलकर, पोउपनि / भुपेश साळुंखे, पोहवा अण्णा केकान, उत्तम तारु, विकास बांदल पोलीस अंमलदार राहुल ओलेकर, सागर शेडगे, विनायक माहिते, सतीश मोरे, समीर माळवदकर, ज्ञानेश्वर डाके यांनी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























