संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
दि. ०५.०१.२०२६ रोजी पुणे येथे मा पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे आदेशान्वये ‘रस्ता सुरक्षा सप्ताह २०२६’ तसेच पुणे शहरातील विविध कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये वाहतुक नियमना विषयी जनजागृती करण्याचे अनुषंगाने पुणे शहरातील विद्यालय, महाविद्यालये मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाना बाबतची चांगली सवय लागावी व अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या अनुषंगाने विद्यार्थी ट्राफिक ब्रँच स्थापन करण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ नन्हे आंबेगाव पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये पहिली शाखा स्थापन करण्यात आली आहे. सदर शाखेमध्ये ११ विद्या
र्थीनी व १४ विद्यार्थी. असे एकुण २५ सभासद यांना वाहतुक शाखे कडुन वाहतुक नियमना विषयी प्रशिक्षण देण्यात आले असुन त्यांना आर. एस. पी बॅच, लाईट बॅटन, लाईन यार्ड, कॅप इ. साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. कॉलेज परिसरात वाहतुक नियमांचे उल्लघन करणाऱ्या वाहनचालंकावर पी. पी. टी. ॲपच्या माध्यमातुन कारवाई करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
सदर कार्यक्रमास माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पणे शहर व पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर तसेच श्रीमती तानवडे मॅडम, सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा पुणे शहर, श्रीमती रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, श्री खंडागळे, सहा.पोलीस निरीक्षक, नांदेडसिटी वाहतूक विभाग, श्री लक्ष्मण नवघणे, पोउनि, ASI सोंडकर, ASI जायभाये, पोहवा गदादे, कॉलजचे प्राचार्य श्री डॉ. सुधाकर जाधवर सर, प्रा. नानगुडे सर सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी असे ५०० ते ६०० उपस्थित होता.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























