Homeक्राईमआंबेगाव पोलीसांची मोठी कारवाई: प्रेमविवादातून झालेल्या निर्घृण खुनातील आरोपी नांदेडहून अटकेत.

आंबेगाव पोलीसांची मोठी कारवाई: प्रेमविवादातून झालेल्या निर्घृण खुनातील आरोपी नांदेडहून अटकेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक २२/१२/२०२५ रोजी फिर्यादी हे त्यांचे नातेवाईक मयत जावेद खादमियाँ पठाण, वय – ३४ वर्षे, यांच्यासोबत गुरुद्त्त वॉशिंग सेंटर गायमुख चौक आंबेगांव बुद्रुक, पुणे शहर येथे काम करीत होते. त्यावेळी जावेद याची मैत्रिण हीचा लहान भाऊ संदिप रंगराव भुरके, वय-२५ वर्षे व त्याचा मित्र असे गुरुद्त्त वॉशिंग सेंटर येथे आले. त्यांनी जावेद पठाण व आरोपीची बहीण यांचे प्रेमसंबंधाचा राग मनात धरून जावेद सोबत हुज्जतबाजी करून संदिप भुरके याने व त्याच्या मित्राने मिळून लोखंडी हत्याराने जावेद यांच्या डोक्यात हातावर वार करून त्यास गंभीर जखमी करून त्याठिकाणाहून पळून गेले. जावेद पठाण हा उपचरादरम्यान मयत झाल्याने घडले प्रकाराबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने आंबेगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३६५ / २०२५ भा.न्या.सं.कलम १०३(१), ३(५), आर्म अॅक्ट ४ (२५), मपोअधि कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला.
खुन करणा-या आरोपीबाबत अधिक माहिती घेतली असता मयत व आरोपी हे भोकर, नांदेड येथे शेजारी राहणारे असून खून करणारे आरोपी त्यांचे मुळ गावी नांदेड येथे गेले असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व पोलीस अंमलदार चेतन गोरे, निलेश जमदाडे, हरिश गायकवाड असे नांदेड याठिकाणी तात्काळ रवाना केले. नांदेडमध्ये भोकर, नांदेड शहर परिसरात स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपींचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. नमूद इसमांना त्यांचा नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे १) संदिप रंगराव भुरके, वय २५ वर्षे, २) ओमप्रसाद ऊर्फ दत्ता गणेश किरकन, वय- २० वर्षे दोघेही रा. चिखलवाडी, प्रफुलनगर, ता. भोकर, नांदेड अशी सांगितली. त्यानंतर त्यांना आंबेगांव पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचेकडे कसोशीने तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून त्याबाबत पोलीस निरीक्षक गुन्हे श्री गजानन चोरमले तपास करीत आहे.

सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२ पुणे श्री मिलींद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त, भारती विद्यापीठ विभाग पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, हरिश गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!