Homeक्राईमगावठी दारूविरोधात वाघोली पोलिसांचा दणका; ८३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

गावठी दारूविरोधात वाघोली पोलिसांचा दणका; ८३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :-9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि.२५/१२/२०२५ रोजी वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत मा. वरीष्ठांचे सुचानाप्रमाणे तपास पथक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार असे भावडी रोड भागात पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार मंगेश जाधव यांना गोपनीय बातमी मिळाली की, भावडी शिवारात एका पडीक शेतात खदानी लगत, भावडी येथे गुळमिश्रीत रसायन भिजु घालुन त्यापासुन हातभटटीची दारु तयार करीत आहेत. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार मोराळे, मंगेश जाधव, गणेश हांडगर, विशाल गायकवाड, मारुती वाघमारे, म.पो शि वृंदा चव्हाण, म.पो.शि मोनिका नवले सदर ठिकाणी जावून रेड केली असता इसम नामे १) रागीनी पंकज राठोड वय २१ वर्षे, रा ५ नंबर भावडी, ता हवेली जि पुणे, २) सुरज धुणई कुमार वय २० वर्षे रा ५ नंबर भावडी, ता हवेली जि पुणे, ३) शिवकुमार राममिलन कुमार वय २० वर्षे रा ५ नंबर भावडी, ता हवेली जि पुणे ४) पंकज मनोज राठोड रा ५ नंबर भावडी, ता हवेली जि पुणे हे त्यांचे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टी दारु तयार करणेसाठी लागणारे रसायन भट्टी लावुन गावठी हातभट्टी दारु तयार करीत असतांना व गावठी हातभट्टी तयार दारु प्रोव्हीबिशनचा माल साहीत्यास मिळून आले त्याचे वर्णनखालीलप्रमाणे.
१. ६३,०००/- रू.किं. चे अंदाजे १८०० लिटर कच्चे गुळमिश्रीत रसायन.
२. ९०००/- रु.किं. चे ९० लिटर तयार हातभट्टी गावठी दारू
३. १०,५००/- रु. किं. चे हातभट्टी गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य.
४. १०००/- रु.किं.चा एक पाणी ओढण्याचा पाईप
असा एकूण ८३,५००/- रु किं चा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीसउप आयुक्त,परीमंडळ ७, पुणे शहर श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग पुणे शहर श्रीमती नूतन पवार, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन, श्री. युवराज हांडे सहा.पो.नि विनायक अहिरे, तपास पथक अधिकारी पो.उपनि मनोज बागल, पो. उपनिरी शिवशंकर रघू, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनीनाथ बोयणे, गणेश हांडगर, मोनिका नवले, वृंदा चव्हाण, बापू बेंद्रे, सिध्दनाथ ढवळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!