Homeक्राईमसासवड शहरात तात्विक कारणावरून झालेल्या किरकोळ भांडणातून धारदार हत्याराने खून करणाऱ्या दोघांना...

सासवड शहरात तात्विक कारणावरून झालेल्या किरकोळ भांडणातून धारदार हत्याराने खून करणाऱ्या दोघांना केले जेरबंद सासवड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पोलीसांची कामागिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

सासवड पोलीस ठाणे गु.र.नं. ४७१२/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) प्रमाणे दि. ०९/१२/२०२५ रोजी दाखल आहे. सदर गुन्हयातील मयत नामे राजू दत्तात्रय बोराडे वय ३८ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, सासवड ता. पुरंदर जि पुणे यांचा दि.०९/१२/२०२५ रोजी ११/०० वा सुास सासवड शहरातील न्यू आनंद वाईन्सचे मागील बाजूस श्री. घाटे यांचे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर जिन्याखाली मृतदेह मिळून आला आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन धारदार शस्त्राने मयताचे गळ्यावर वार करुन खून केला आहे. सदर प्रकरणी मयताचा भाऊ गजानन दत्तात्रय बोराडे वय ३३ वर्षे रा. हिवरकर मळा, सासवड ता. पुरंदर जि पुणे यांनी वरील प्रमाणे फिर्याद नोंदविली आहे.
मा. पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व सासवड पोलीस स्टेशन कडील पथकांनी एकत्रित सुरू केला. घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले. मयताची माहिती घेण्यता आली असता, मयत राजू दत्तात्रय बोराडे यास दारु पिण्याचे व्यसन असून तो आक्रमक स्वभावाचा असल्याने त्याचे अनेक लोकांशी वाद आहेत. घटना घडले ठिकाण व सासवड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पथकांनी तपासत असताना, दोन संशयित इसम मयत याचेसोबत घटनास्थळाकडे जात असताना दिसून आले. सदर इसमांचे फुटेज व फोटो डेव्हलप करुन त्याबाबत पुढे तपास सुरु केला. सदर संशयित इसमांचा शोध घेणेकामी पुणे शहर हददीत कोंढवा, हडपसर या भागात तपास पथके रवाना करण्यात आली होती. तसेच सदर आरोपीचे फोटो घटनास्थळाचे आजूबाजूचे लोकांना, मजुर, ठेकेदार, सासवड शहरातील जास्तीत जास्त लोकांना दाखवून आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न चालू होता.
त्याअनुषंगाने तपास पथके सासवड परिसरात संशयित आरोपी यांचा शोध घेत असताना आनंद वाईन्स सासवड येथे एक संशयित इसम दारू विकत घेण्यासाठी येताना तपास पथकातील पोलीस अंमलदार अक्षय चिले यांचे निर्देशनास पडला, त्याचे वर्णन गुन्हयातील संशयितांचे वर्णनाशी जुळत होते, त्यामुळे त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सुरज प्रकाश बलराम निषाद वय.३४ वर्ष, धंदा बांधकाम मजुर, रा. मंगलोर, पो. पतोरा, छत्तीस गड असे सांगितले. चौकशी दरम्यान त्याची हालचाल व उत्तरे संशयित- विसंगत होती, त्यामुळे त्यास सासवड पोलीस स्टेशनला आणून सखोल चौकशी करणेत आली. त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार नीरज ओम प्रकाश गोस्वामी वय २५ वर्षे व्यवसाय बांधकाम मजुर रा.गोल पडीया, जिल्हा ग्वाल्हेर, मध्यप्रदेश याचे सोबत केल्याचे कबुल केले. त्या आधारे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले.
आरोपी १) सुरज प्रकाश बलराम निषाद वय. ३४ वर्ष, धंदा बांधकाम मजुर, रा. मंगलोर, पो. पतोरा, छत्तीस गड २) नीरज ओम प्रकाश गोस्वामी वय २५ वर्षे व्यवसाय बांधकाम मजुर रा. गोल पडीया, जिल्हा ग्वाल्हेर, मध्यप्रदेश यांचे कडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता मयत व आरोपी हे एकमेकांचे परिचयाचे नव्हते, परंतू घटनेच्या दिवशी सोमवार दि. ०८/१२/२०२५ रोजी यातील दोन्ही आरोपी दारु पित असताना यातील मयत त्यांचे जवळ गेला व दारु पिण्यावरुन त्यांचेत वाद झाला. त्यामध्ये यातील मयताने आरोपीत यांना चाकूचा धाक दाखवून धमकी दिली यावरुन सदर दोन्ही आरोपीत यांनी मयतास दारु पाजून त्यास घटनास्थळावर घेवून जावून त्याचेकडीलच चाकू घेवून त्याचा चाकूने वार करुन खून केला असल्याची कबुली दिली आहे.
तसेच यातील आरोपी नामे नीरज ओम प्रकाश गोस्वामी वय.२५ व्यवसाय बांधकाम मजुर रा.गोल पडीया, जिल्हा ग्वाल्हे,मध्यप्रदेश याने जामखेड येथील विकास मधुकर अंधारे वय.२२ याचा पैशाचे वादातून किरकोळ भांडणातून खून केल्याची कबुली दिली आहे. त्याबाबत जामखेड पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे अकस्मात मयत रजि.नं.८१/२०२५ दि.२४/११/२०२५ रोजी दाखल आहे. सदर दोन्ही आरोपी हे १०-१२ दिवसांपुर्वीच सासवड येथे कामासाठी आले होते. आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेणे अतिशय आव्हानात्मक होते. सदरचे आव्हान सासवड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी स्विकारून सलग ७ दिवस परिश्रम घेवून संशयित आरोपींचा ठिकठिकाणी शोध घेतला आणि स्विकारलेले आव्हान पुर्ण करत दोन आरोपींना जेरबंद करणेत तपास पथकांना यश आले आहे. आरोपींकडून वरील दोन्ही खूनाच्या घटनांचा उलगडा झालेला आहे.
आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता, दि. १९/१२/२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करणेत आलेली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्रसिंह गौर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सासवड पोलीस स्टेशनचे पो.नि. कुमार कदम, सपोनि वैभव सोनवणे, पोसई परमेश्वर गोडसे, पोसई अर्जुन चोरगे, पोसई नारायण खंडागळे, अंमलदार सुरज नांगरे, जब्बार सय्यद, सुहास लाटणे, शरद जाधवर, गोकुळ हिप्परकर, प्रणय मखरे, अक्षय चिले, सचिन किवळे, स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि दत्तात्रय मोहिते, श्रेणी पोसई बाळासाहेब कारंडे, अंमलदार अमोल शेडगे, मंगेश भगत, धीरज जाधव यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. परमेश्वर गोडसे हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!