संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! अंमली पदार्थ विरोधी पथक.२ गुन्हे शाखा,पुणे शहर !
दि.२४/११/२०२५ रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये अंमली पदार्थ विरोधी मोहिम येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत राबवित असताना अंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, व स्टाफ यांना वेद प्रोव्हीजन स्टोअर्स सर्वे नं.१४, संजय भोसले यांच्या ऑफीसच्या जवळ, नाईक नगर, येरवडा पुणे या दुकानामागे मागील गोडावुन मध्ये आरोपी नामे जमनाराम ऊर्फ गणेश बलराम जाट, वय-२५ वर्ष रा. सर्वे नंबर १४, संजय भोसले यांच्या ऑफीसच्या जवळ, नाईक नगर, येरवडा पुणे याचे ताब्यात २०,७०,५००/- किंमतीचा प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ असा ऐवज जप्त करुन त्यांचे विरुध्द येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं—– / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३,२७४, २७५, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने ( जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय ) अधिनियम कलम ७ (२) व२० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६,चे कलम २६(२)(i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिल नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त श्री. पकंज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा.पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाख पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, तसेच पोलीस अंमलदार राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, सुनील महाडीक, ऋषीकेश ताकवणे, संदिप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, शुभांगी म्हाळसेकर यांनी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























